माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांची हिरापूर शाळेला भेट.

माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांची हिरापूर शाळेला भेट.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : आज दिनांक 20 जुलै 2023 रोजी  श्री माननीय विवेक जॉन्सन साहेब मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी पंचायत समिती सावली अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरापूर येथे भेट दिली . शाळेच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.नूतन रवींद्र घोगरे 7 वा  हिने मान.विवेक जॉन्सन साहेबांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सोबत श्रीमान.कपिल कलोडे साहेब उपमुख्य कार्यपालन अधिकारी पंचायत जिल्हा परिषद चंद्रपूर,श्री माननीय मधुकर वासनिक साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली,श्री माननीय लोकेश खंडारे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावली,सर्व क्षेत्रीय अधिकारी पंचायत समिती सावली तसेच सरपंच सौ.प्रीतीताई गोहणे मॅडम तथा सर्व पदाधिकारी उपस्थित होते . आजच्या शाळा भेटी दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा बाबत चर्चा केली.


तसेच शाळेतील भौतिक सुविधा बाबत सूचना केल्या .माननीय मुख्य कार्यपाल अधिकारी साहेब यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी वर्गात जाऊन संवाद साधला .इयत्ता 5 व्या वर्गाची गुणवत्ता तपासणी केली व समाधान व्यक्त  करून पुढे अधिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी सतत  प्रयत्न करत रहावे अशा मौलिक सूचना केल्या.भेटी दरम्यान माननीय मुख्याध्याप तथा सर्व शिक्षक,शिक्षिका वृंद उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !