कोचीनारा येथे पतीने केली पत्नीची कुन्हाडीने हत्या : मुलगी जखमी.
एस.के.24 तास
कोरची : मुख्यालयापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या कोचीनारा येथील रहिवासी प्रितराम धकाते (५५) याने आज सकाळी ११ च्या सुमारास जंगलात लाकूड तोडायला गेलेल्या आपल्या पत्नी रेखा धकाते (५०) व मुलगी शामबाई देवांगन (३०) वर कुन्हाडीने वार केला. पत्नीच्या डोक्यावर व पाठीवर त्याने कुन्हाडीने वार केला. मदतीसाठी गेलेल्या मुलीवर सुद्धा त्याने हल्ला केल्यामुळे मुलीचा हाथ प्रच्चर झाला व पाठीला सुद्धा मार लागला.
लगेच मुलीने गावाकडे मदतीसाठी धाव घेतली व जंगला नजीक असलेल्या घरातून मोबाईलने आपल्या पतीला संपर्क केला. जावई यांने घटनास्थळी जाऊन आपल्या सासूला दुचाकीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु काही वेळाने रेखा यांची प्राणज्योत मिळालेल्या माहितीप्रमाणे सकाळी शामबाई व रेखाबाई गावातील २ महिलांसोबत जंगलात जलाऊ लाकूड आणण्याकरिता गेले होते मनात पूर्वी पासूनच राग धरून असलेल्या प्रितराम ने आपल्या पत्नीचा पाठलाग करत जंगलातच तिच्यावर कुन्हाडीने डोक्यावर व पाठीवर वार करून गंभीर जख्मी केले.
यापूर्वी सुद्धा प्रितराम आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता व त्याची लेखी तक्रार सुद्धा पोलीस स्टेशन कोरची येथे करण्यात आली होती.काही दिवसापूर्वी प्रितराम धकाते यांनी आपल्या पत्नीला मारण्याकरिता साबर लोखंडी सळाख उचलली होती. त्याची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. मागील काही महिन्यापासून प्रितराम हा आपल्या परिवारातील सदस्यांना धमकी देत होता नेहमी दारू पिऊन शिवीगाळ करीत होता.पुढील चौकशी कोरची पोलीस स्टेशन कडून करण्यात येत असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर यांनी दिली.