ग्रा.पं.व आरोग्य वर्धिणी उपकेंद्र जुनासुर्ला च्या वतीने गरोदर मातांना लोखंडी भांडी वितरण व माता कोपरा जनजागृती.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
मुल : तालुक्यातील जुनासुर्ला येथे दिनांक १७/०७/२०२३ ला प्रतिकार बँक सभागृहात ग्रामपंचायत व आरोग्य वर्धिणी उपकेंद्र जुनासुर्ला च्या वतीने गरोदर मातांना लोखंडी भांडी वितरण व माता कोपरा जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक मा.चंदु भाऊ मारगोनवार माजी सभापती पंचायत समिती मुल,अध्यक्ष मा.विनोद वैद्य विस्तार अधिकारी पं.स. मुल,मा.रंजित समर्थ सरपंच ग्रा.पं.जुनासूर्ला,मा. वंदनाताई अगरकाटे अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना मुल, मा.डाॅ.किशोर भट्टाचार्य वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबाळ मा.डाॅ. अचल मेश्राम साहेब वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबाळ,मा बघेल साहेब मुलल, मा.सौ.बुरांडे बी.सी. एम,मा.प्रणाली जिल्लेवार समुदाय आरोग्य अधिकारी जुनासूर्ला मा.खुशाल टेकाम उपसरपंच,सौ.आशाताई देशमुख पोलीस पाटील, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, सौ.प्रीती रत्नावार,अंगणवाडी सेविका,मदतनीस आशा वर्कर गरोदर माता व बचत गटाचे सर्व सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रास्ताविक करीत श्री.मा रंजित समर्थ सरपंच यांनी गरोदर मातांना मार्गदर्शन केले,भटाचार्य साहेब यांनी गरोदर मातांना लोखंडी भांडी वापरण्याचे फायदे सर्वांना पटवून दिले,मा.चंदु भाऊ मारगोनवार,सौ.वंदनाताई अगरकाटे,बुरांडे मॅडम,विनोद वैद्य साहेब यांनी सुद्धा उपस्थित गरोदर मातांना लोखंडी भांडी वापर करून घेण्याचे आवाहन केले , कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.वर्षा पाल अंगणवाडी सेविका चांदापुर व आभार-प्रदर्शन प्रीती रत्नावार यांनी केले.