एस.टी.बस थांबा मौजा सिंदपुरी करिता वैनगंगा नदी पुलाजवळ द्या. - सरपंच विजय मानापुरे यांची मागणी.

एस.टी.बस थांबा मौजा सिंदपुरी करिता वैनगंगा नदी पुलाजवळ द्या. - सरपंच विजय मानापुरे यांची मागणी.

नरेंद्र मेश्राम   


भंडारा : पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथे जाण्यासाठी वैनगंगा नदीच्या पुलाजवळ असलेला थांबा बंद केल्याने शैक्षणिक व इतर कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ लागलेला आहे.


अनेक वर्षापासून सिंदपुरी जाण्यासाठी वैनगंगा नदीच्या पुला जवळ प्रवाशांच्या सोयीसाठी थांबा होता. परंतु राज्य परिवहन वाहतूक च्या बसेस यांनी मागील काही दिवसापासून हा थांबा बंद केलेला आहे प्रवाशांना त्रास होत आहे तरी प्रवाशांच्या सोयीसाठी पुलाजवळ थांबा देण्याची विनंती सिंदपुरीचे सरपंच विजय मानापुरे यांनी आगार प्रमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदन देतेवेळी   बाळू फुलबांधे सरपंच विजय मानापुरे  तसेच स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संघटना भंडारा जिल्हा सचिव त्याचप्रमाणे  स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संघटना भंडारा जिल्हाध्यक्ष शेखर जीभकाटे उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !