मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तथा शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यायल पोर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा कौशल्य दिवस साजरा.
एस.के.24 तास
गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली जिल्हात मागील तीन वर्षांपासून १२ ते १६ वयोगटातील मुलांसाठी"खेळाच्या माध्यमातून विकास व विषयात्मक शिक्षण" सत्राच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवित आहे.या कार्यक्रमाअंतर्गत जीवन कौशल्य - संवाद कौशल्य,संघकार्य, समस्या सोडविणे, शिकण्यातून शिकणे,स्व - व्यवस्थापन व विषयात्मक शिक्षण - संख्या ज्ञान व भाषा ज्ञान आदी क्षेत्रावर काम करीत आहे.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली व शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यालय पोर्ला. अंतर्गत युवक कौशल्य दिवस " युवकांचे कौशल्य " या विषयावर चित्रकला स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये एकूण १६१ मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. डी.एम.दिवटे सर प्राचार्य शिवाजी हासस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला श्री. प्रमुख पाहुणे- मा. श्री एस एल दोनाडकर सर मा.सौ.बी.बी.वासेकर मॅडम मा.श्री.जी पी वणकर सर मा.श्री.एस एम पडवाल सर मा.श्री. डी.जी.सेडमाके सर मा. कु. आर वि राजनहिरे मॅडम मा कु.कुकुडकार मॅडम यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदेश - १) मुलांना त्यांच्यात असलेले कौशल्य माहीत वाव्हे आणि त्यांनी त्या कौशल्याचा वापर करून आपला भविष्य घडवावा.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे सर,यांच्या मार्गदर्शनात व गडचिरोली तालुक्याचे समन्वयक श्री,देवेंद्र हिरापुरे यांच्या सहकार्याने व जीवन कौशल्य शिक्षक श्री. मा लेखाराम हुलके. विषय शिक्षक मा श्री. अनिल खोब्रागडे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.