सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते शोकसभा शेड चे उद्घाटन.

सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते शोकसभा शेड चे उद्घाटन. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : जन सुविधा निधी अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे स्मशानभूमीत शोकसभा शेड चे उद्घाटन कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, जिवनातील शेवटचा विसावा हा समशानाचा असतो. मनुष्याला मरण हे अटळ आहे या शेवटचया क्षणी येणारे सखे सोयरे पाहुणे यांची गैरसोय होता कामा नये. जेष्ठ नागरिकांना अंत्यविधी दरम्यान विसावा घेता यावा व शेवटची शोकवदना या शोकसभा शेड मधुन देता यावी म्हणून या शोकसभा शेड ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 


या प्रसंगी उपसरपंच कौशल्य कावळे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, ग्रामपंचायत सदस्य रंजना पिंगे, सुनीता उमाटे, ज्येष्ठ नागरिक तुकडोजी महाराज पुतळा कमेटी चे अध्यक्ष पुंडलिक पिंगे, उध्दव पाटील आसवले, लटारी बल्की,  सुभाष वाढई, विठ्ठल वाढई, ग्रामसेवक नारनवरे, विठ्ठल बल्की, अनिल मेश्राम, नितेश पिंगे, विनायक धांडे, रामचंद्र खाडे, भाऊराव चापले, उमेद च्या सखी सुचिता धांडे, संगीता धांडे  किशोर रागीट, शिपाई विशाल नागोसे यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !