मुल तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची चांदापूर फाटयावर गतिरोधकाची मागणी.

मुल तालुका उद्धव बाळासाहेब  ठाकरे शिवसेनेची चांदापूर फाटयावर गतिरोधकाची मागणी.


★ अन्यथा आंदोलन करण्या चा ईशारा.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मूल : तालुक्यातील चांदापूर फाटा येथे  चौक असून, मागील तिन वर्षा पासून खेडी गोंडपिपरी रस्त्याचे रंदीकरणाचे काम सुरू आहे, त्या मूळे अनेकदा या चौकात,रस्त्यात अपघात  झाले, त्यात जीवीत हानी होवून अनेकांना आपले जीव गमवावे लागले .

काल दि.29/7/2023 रोजी सायंकाळचे सुमारास खेडी कडून येणारे ट्रक व मूल वरून जाणारी प्रवाशी बस या मध्ये टक्कर होवून, चांदापूर फाटा चौकात जोरदार अपघात झाला,,बस मधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, जीवीत हानी टळली .

आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी सुदधा मोठ्या प्रमात, खेड्यातून मूल शहरात शिक्षण घेण्यास. जातात,चांदापूर फाटा चौकातून, मूल चामोरशि, खेडी गोंडपिपरी चार तालुक्याना जोडणारा रस्ता आहे व प्रवाशी अॅटो, काळी पिवळी, प्रवाशी खाजगी गाड्या, बस सेवा, खाजगी गाड्या, सह बाहेर राज्यात  माल वाहक ट्रक गाड्या ची मोठ्या प्रमाणात  वाहतुक, वर्दळ असते .


याच अनुषंगाने, मूल तालुक्यातील उद्धव ठाकरे  शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी, मूल येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात, चांदापूर फाटयावर चारही बाजूने गतिरोधक देण्यात यावा,,अपघात टाळण्यास मदत होईल अशा प्रकारचे निवेदन दिले,त्वरीत गतिरोधक देण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्या चा ईशारा ही संबंधीत विभागास दिला,हे निवेदन देताना तालूका संघटक रविंद्र शेरकी, सौ, रजनीताई झाडे, तालूका महीला प्रमुख,  महेश चौधरी शिवसेना नेते मूल, सुनिल काळे माजी तालुका प्रमुख, प्रविण भरतकर जेष्ठ शिवसैनिक, ओमदेव मोहूरले,मा.युवा सेना तालुका प्रमुख तसेच प्रसिद्धी प्रमुख मूल ,तथा सामाजिक कार्यकर्ते नंदू बारस्कर इत्यादी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते. 


या पुर्वी मागील महिन्यात चांदापूर फाटा चौकात शिवसेनेच्या वतीने रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे या साठी  मोठे  आंदोलन करण्यात आले होते हे विशेष.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !