शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यासाठी ; शेतात काळा झेंड्याची लागवड.

शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यासाठी ; शेतात काळा झेंड्याची लागवड.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


चंद्रपूर : शेतकरी शेतमजुर एल्गार  परिषदेच्या वतीने . गोंदिया,चंद्रपूर,यवतमाळ या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांच्या न्याय हकक मागण्या मान्य करण्यासाठी निवेदने,मोर्चे,मेळावे घेऊन सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अजूनही सरकारला जाग येत नाही म्हणून या खरीप हंगामामध्ये तेलंगणाच्या सीमेवरील झरी जामनी  तालुक्यातील गवारा या गावातून दि.८/७/२३ रोजी अभिनव आंदोलन करण्यात आले.


 शेतकरी शेतमजुरांनी शेतकरी शेतमजुर एल्गार परिषदेच्या माध्यमातून बियाण्यांच्या लागवडी सोबतच काळा झेंड्याची लागवड करून  सरकारचा निषेध  करण्यात आला व या ठिकाणी असंख्य शेतकरी शेतमजूर उपस्थित होते. बियाण्यांची लागवड करताना खालील मागण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा निषेध करण्यात आला दिनांक 19/6/23  रोजी विद्यमान जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन सादर केले होते.


 .यवतमाळ जिल्ह्याला लगत  असणारा राष्ट्रीय अभयारण्याला लागून असणाऱ्या गावांमध्ये वाघांचा प्रचंड धुमाकूळ आहे व वाघांच्या या धुमाकूळ मुळे प्रत्येक गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे हया महिना पासून शेतीचे काम सुरू होत असून शेतकरी शेतमजुरांना शेतामध्ये जाणे आता कठीण झालेले आहे .शेतकरी शेतमजूर अतिशय दहशतीच्या वातावरणामध्ये शेती करण्यासाठी जात आहे.


आतापर्यंत वाघाने अनेक  लोकांचे बळी घेतले असून त्यांना अल्पशा नुकसान भरपाई देवून त्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. माणसांच्या हत्याकांडाचे सत्र  सातत्याने सुरू आहे .तेव्हा ते त्वरित थांबवावे , शेतकऱ्यांचे ढोर जंगलात गेले तर त्याच्यावर वनविभाग गुन्हे दाखल करतात*  मग वनविभगाचे ढोर (वाघ) शेतकरी शेतमजूर, गावकऱ्यांची हत्या करते तेव्हा  वनविभागा वर सुध्दा गुन्हे दाखल करावे. शेतकऱ्यांना प्रति एकर 10000 रू लागवडीचा खर्च द्यावा., शेतकरी व शेतमजूर ना पेन्शन लागू करावी.


सिंचनाची व्यवस्था त्वरित करावी त्यासाठी बोरवेल मोटर पंप सहित मोफत वीज द्यावी . प्रत्येक गावात धान्य साठविण्यासाठी गोडवून ची व्यवस्था करावी.,अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना* कायदेशीर पट्टे देण्यात यावे.,*वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान त्वरित थांबवून दोन दिवसात पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी,तेंदुपत्ता संकलन चा बोनस त्वरित अदा करावा.


 अशा विविध मागण्या घेवून शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अड.राजेंद्र महाडोळे , व राम भेंडारे जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांचे नेतृत्वात झरीं जमनी तालुका अध्यक्ष दिनेश गुरनूले व राज्य पदाधिकारी अमोल गुरनुले, राजेंद्र मांदाडे, व शेतकरी शेतमजूर विमलबाई टेकाम ,शारदाबाई गुरनुले, वनिता बाई मोहूर्ले,यमुनाताई वाढई, सुवर्णा गुरनुले,मंगलाताई वाढई ,तानीभाई आत्राम,वंदना गुरनुले, ,विमलबाई फसलवार 


,रंजना धुर्वे ,सुशीला मेश्राम ,मीना व्यवहारे ,मालताताई गुरनुले,संजय मेश्राम, मारुती आत्राम, मनोज नुगुनवार, पदू प्रधान, विठ्ठल वसाके,सुभाष गुरनुले ,संदीप गुरनुले ,अशोक चहारे ,हनुमंत फसलवार, गोपाल गुरनुले,रामभाऊ मडावी,अमोल चाहारे,नामदेव गुरनुले,यादव वाढई,राहुल ठाकरे ,मुन्ना गेडाम ,पवन शेंडे, मारुती आत्राम, अंकुश सातपुते, इत्यादी अनेक पदाधिकारी यांनी निवेदन देवून शासन दरबारी मागणी केली आहे .जर शासन याकडे लक्ष देत नसेल तर उपरोक्त मागण्यांसाठी तीव्र आंदोलन कण्याची भूमिका घेतली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !