जि.प.शाळा बोढेगांव येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१/७/२३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोढेगाव. ता ब्रम्हपुरी येथे दि 30जून रोजी शाळा प्रवेशोत्सव आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी इय्यता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून मंगल तिलक, औक्षवन करून त्यांच्या घरून त्यांना सजवलेल्या बैलबंडीमध्ये बसवून भजन कीर्तनासह गावातून त्यांची मिरवणूक काढून शाळेमध्ये आणण्या आले.त्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
मुलांना शिक्षणाची गोडी लागावी,विद्यार्थ्यांचा शाळेतला पहिला दिवस संस्मरणीय व्हावा, त्यांना शाळेत येताना आनंद वाटावा यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचा समारोप सहभोजनाने करण्यात आला.
या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण ढोंगे ,उपाध्यक्ष श्री सुधीरजी नन्नावरे ,गावचे सरपंच श्री मंगेश जी नन्नावरे, गावातील प्रतिष्ठित नागरिक राजीरामजी ननावरे ,केशवजी ढोंगे,सौ.उज्वला नखाते, सौ. गायत्री चंदनबावने गावातील भजनी मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले शिवानंद गादेवार यांनी संचलन केले तसेच मुख्याध्यापक श्री,नितिन डेहनकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.