जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरापूर येथे शाळा पूर्वतयारी क्रमांक 2 चे आयोजन.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : आज दिनांक,4 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरापूर येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 चे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी मेळाव्याचे उद्घाटक म्हणून सन्माननीय प्रीतीताई गोहणे सरपंच ग्रामपंचायत हिरापूर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष,म्हणून माननीय संदीप भाऊ सायत्रावार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हिरापूर हे होते.त्याचप्रमाणे मेळाव्यासाठी सर्व सदस्य गण,सर्व विद्यार्थी पालक तथा सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
प्रास्ताविक कुमारी मोहूर्ले मॅडम मुख्याध्यापिका यांनी केले तर कोरोना काळानंतर शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे महत्व आणि आवश्यकता या विषयावर माननीय अध्यक्ष महोदयांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,श्री किशोर लाडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.माणिक पाटेवार यांनी केले.सर्व शिक्षकांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले .अशाप्रकारे आनंददायी वातावरणात शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 2 चे यशस्वी आयोजन करण्यात आले.