कॅन्सरचे निदान करणाऱ्या रुग्णवाहिकेचे 13 जूलै रोजी ब्रम्हपुरीत होणार आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते लोकार्पण.
★ माजी मंत्री,आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्यातील पहिलाच प्रयोग.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१२/०७/२३ वाढत्या कॅन्सर आजाराला आळा घालण्यासाठी, दरवर्षी ३०० कॅन्सरग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्याचे ध्येय पुढे ठेवून सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून प्रगत तंत्रज्ञान युक्त राज्यातील पहिले अत्याधुनिक "कॅन्सरचे निदान करणारी रुग्णवाहिका (हॉस्पिटल)" महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत राज्याचे माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने 13 जूलै रोजी समर्पित करण्यात येणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविण्यात येणार असून ब्रम्हपूरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. 13 जूलै रोजी बुधवारी, सकाळी 10 वाजता या कॅन्सर तपासणी रुग्णवाहिकेचे (हाॅस्पिटल) लोकार्पण राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असुन अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कडे मदतीच्या अपेक्षेने आलेल्या अनेक कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी नेहमीच आर्थिक मदत केली आहे. परंतु कॅन्सरवर प्रतिबंध कसा घालता येईल यासाठी त्यांनी तज्ञ डाॅक्टरांसोबत चर्चा केली. व यावेळी वेळेपुर्वीच कॅन्सर डिटेक्ट होण्याच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती मिळताच त्यांनी लगेच ती रुग्णवाहिका तयार करण्याचे निर्देश दिले. या गाडीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाच्या मशिन बसविण्यात आल्या आहेत. त्याद्वारे कॅन्सर होण्याची लक्षणे असतील तर त्याचे वेळीच निदान होणार आहे. यासोबतच कॅन्सर झाला असेल तर तो कोणत्या स्टेजला आहे हे सुद्धा कळणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळीच उपचार घेता येणार असून जीव वाचण्यास मदत होणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान बनावटीचे मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग हॉस्पिटल ऑन व्हील्स महाराष्ट्राच्या दुर्गम भागात पोहोचून कर्करोगांची तपासणी करणार असुन त्यामध्ये प्रामुख्याने स्तनाचा, तोंडाचा, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रारंभिक टप्प्यात शोधून रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी वस्तीत राहणारे उपेक्षित आणि वंचित कुटुंब जे आर्थिक स्थितीमुळे कर्करोग तपासणी करू शकत नाही अश्या कुटुंबांसाठी हा उपक्रम जिवनदान देणारा ठरणार आहे.
स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल. उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे. अमेरिकेतील संस्थेशी करार करण्यात आला असून तज्ञ डॉक्टराचा चमू तपासणी करणार आहे. रूग्णवाहिकेमुळे कर्करोगाचे वेळीच निदान होवून रूग्णांला वेळीच उपचार उपलब्ध होणार आहे.या रूग्णवाहिकेत नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर जर त्याला कर्करोगाचा धोका असेल तर त्याचे वेळीच निदान होणार आहे.
कॅन्सरचे निदान करण्यासाठी अमेरिकन संस्थेशी करार केला असून त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांची चमू त्या रुग्णांवर उपचार करणार आहे. कर्करोगामुळे एकाही नागरिकांचा मृत्यू होवू नये यासाठी हे अद्ययावत तंत्रज्ञान प्रथमच ब्रम्हपुरी मतदारसंघात आणण्यात येत असून या रूग्णवाहिकेचा गोर-गरीब जनतेला लाभ होणार आहे. अत्यंत लोकपयोगी असलेल्या या उपक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनसेवेसाठी पुर्णतः समर्पित असलेले खरे लोकसेवक आमदार विजय वडेट्टीवार यांच्या जनसेवेचे प्रत्यक्ष उदाहरण अनुभवयास मिळणार आहे.