कार व एआबी ट्रॅव्हल्स च्या भीषण अपघातात सहा ठार.

कार व एआबी ट्रॅव्हल्स च्या भीषण अपघातात सहा ठार.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


चंद्रपूर : कार व ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात सहा ठार नागपूर वरून नागभीड कडे येणारी मारुती कार MH-49-BR 2242 आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी MH - 33 - T 2677 ट्रॅव्हल्स चा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला.या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला.हा अपघात दुपारच्या सुमारास झाला.मृतक सर्वजण नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.


कारमधील एकूण सहापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी व महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले होते.मृतकांमध्ये रोहन विजय राऊत (३०), रूषिकेश विजय राऊत (२८), गिता विजय राऊत (४५), सुनिता रूपेश फेंडर (४०),प्रभा शेखर सोनवणे (३६),यामिनी रूपेश फेंडर (९) यांचा समावेश आहे. सर्व जण नागपूरातील आहेत.कार कापून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !