आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रम्हपुरीत रुग्णांना फळ वाटप.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१३/०६/२३ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा पक्षप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस ब्रम्हपुरीतील युवा सेना शाखेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
या वाढदिवसाचे औचित्य साधून आज युवासेना तालुका ब्रम्हपुरीच्या शाखेच्या वतीने ग्रामीण रुग्णालया ,ब्रह्मपुरी येथे जाऊन रुग्णांना फळवाटप करण्यात आले.या वेळेस युवासेना तालुकाप्रमुख यादवभाऊ रावेकर तसेच युवा सेना शहर प्रमुख कमर अली सय्यद,तसेच युवा सेना कार्यकर्ते पूरू भाऊ नवघरे,अमर करकाडे, रईस खान, रवी पवार,युवराज नागापुरे,काशीम शेख, शाम कराडे, अभी शेंडे,रोहित सहारे,रोहित वाघधरे, सुबोध शेंडे आणि शहर व परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.