मॅजिक बस संस्थेच्या वतीने,जागतिक पर्यावरण दिन संपन्न.

मॅजिक बस संस्थेच्या वतीने,जागतिक पर्यावरण दिन संपन्न.


एस.के.24 तास


चामोर्शी : दिनांक,05 जून 2023 ला मॅजिक बस  संस्थेच्या वत्तीने गडचिरोली जिल्ह्यात,चामोर्शी तालुक्यातील मौजा, भेंडाळा,मुरखडा(माल),वाघोली,गणपूर,सोनापूर आणि कुनघाडा इत्यादी गावांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दीना निमित्ताने गावातील विद्यार्थ्यांना  टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करणे, जेणेकरून टाकूऊ वस्तूंचे व्यवस्थापन करता येईल. त्यासोबतच पर्यावरण जनजागृती मोहीमेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करणे का गरजेचे आहे त्याचे महत्व पटवून देण्यात आले. पर्यावरणा बद्दल आवड आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांमध्ये स्वच्छते बद्दल आवड निर्माण व्हावी त्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना आभार पत्र (Greetings Card) देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.


सदर कार्यक्रम मॅजिक बस संस्थेचे वरीष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे व  तालुका समन्वयक आकाश गेडाम यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला.  कार्यक्रमाला  गावातील सरपंच, सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य  पालक वर्ग व विद्यार्थी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडन्या करीता युवा मार्गदर्शक प्रफुल निरूडवार,रोशन तिवाडे,दीपक ढपकस,सोनी शिऊरकर,पंकज शंभरकर,अश्विनी उराडे व  विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !