व्याहाड खुर्द येथे चक्क चोरानी जेवण व दही खाऊन विचित्र चोरी करून दागदागिने व रोकड लंपास केले.
★ व्याहाड खुर्द येथे चोरांची दहशत.
विजय नरचुलवार - विशेष प्रतिनिधी
व्याहाड खुर्द : येथे चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.त्याच्या विचित्र चोरीमुळे नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. तो घरात घुसून घरातील उरलेलं जेवण,दही,जे खायला वस्तू मिळेल ते खाऊन नंतर चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना व्याहाड खुर्द येथे गावातील रस्त्यालगत असलेल्या घरात घुसून चोरट्यांनी घरातील सोने दागिने, नगदी रक्कम लंपास केले आहे.
व्याहाड खुर्द येथील रहिवासी दीपक वासुदेव जवादे हे विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था चे अध्यक्ष आहेत. दीपक जवादे हे आपल्या राहत्या घरी दि. १७/६/२३ ला रात्रो ९ वा दरम्यान पत्नी, आई, वडील व दोन मुले असे सर्व मिळून जेवण केले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तळ मजल्यावरील घराचे सर्व दार व्यवस्थित बंद करून लॉक लावून पहिल्या माळ्यावर झोपण्याकरीता गेले.
परंतु झोप येण्या अगोदर सर्व घरची मंडळी आपापसात गप्पा गोष्टी करत १०.३० च्या दरम्यान सर्व झोपी गेले. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला असता तर जवादे यांची सकाळी ६ वाजता झोप उघडली आणि तळ मजल्यावर खाली उतरून पहिला, दुसरा दरवाजा उघडला परंतु तिसरा दरवाजा उघडण्यास गेले तर सदर दरवाजा हा आतून लावण्यात आला असल्याने त्यांना आश्चर्य वाटल आणि लगेच घरा मागील दरवाजाकडे गेले असता तर तो दरवाजा बाहेरून लावण्यात आल्याचे चित्र दिसले.
यावेळी जवादे यांना शंका आली आणि तज्ञांनी घराच्या खिडकीमधून बघितले असता तर बेडवरील सामान फेकफाक,कपाट मधील सर्व सामान कपडे लत्ते सर्वत्र फेकफाक अस्तव्यस्त झाल्याचे यावेळी चित्र आढळून आले.यानंतर जवादे यांनी घरा मागील दरवाजा उघडून खोली जावून बघितले असता तर सर्व बेडवरील सामान,कपाट मधील असलेली सामान अस्तव्यस्त फेकफाक दिसल्याने आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच या घटनेबाबत सावली पोलीस स्टेशन मध्ये याबाबत माहिती दिली. यावेळी पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
सदर या चोरी मध्ये जवादे यांचे कपाट मधील दीड तोड्याचा सोन्याचा मंगळसूत्र, एक लहान ४ ग्रामचा सोन्याचा मंगळसूत्र, ३ ग्रामचा सोन्याचा कानातील बारी,दीड ग्राम कानातले लटकन, ४ ग्राम सोन्याची अंगठी, तसेच जवादे यांना मित्रांनी दिलेले उधारी पैसे रक्कम ३०,००० रु.पत्नीने दुध,दही विकून जमा केलेली ४०,०००रु.तसेच प्यांट च्या खिशात असलेले १५,०००रु.असे सोने दागिने व रोख रक्कम एकूण १,३१,७६३ रुपये लंपास केल्याचे निदर्शनास आले. सदर चोरीमध्ये चोरांनी चोरी सोबत घरातील असलेले जेवण, दुध, दही, जे मीळेल ते वस्तू खाऊन घरातील भांडे सुद्धा फेकफाक करून पसार झाले. यावेळी पोलिसांनी घटनेची चौकशी अंती डॉग पथकाला बोलावून तपास केले असता तर यावेळी डॉग जवादेच्या घरा पासून काही अंतरावर असलेल्या चिंचेच्या झाडा पर्यंत शोध घेतला मात्र तिथून पुढे शोध घेता आला नाही.यावेळी पोलिसांनी अज्ञात चोर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.
अशीच विचित्र चोरी काही महिन्यापूर्वी व्याहाड येथील उपवनपरिक्षेत्र कार्यालयात झाली होती. तिथेही चोरांनी वनप्राण्याचे असलेले चामडे नखे चोरीला गेले आणि इथेहि चोरांनी स्वयंपाक बनवून जेवण करून भांडे फेकफाक करून पसार झाले. तसेच व्याहाड येथील बाजारपेठ हि मोठ्या प्रमाणत असल्याने अनेक व्यापारांचे दुकाने फोडून चोरी केलेले आहेत.एकंदरीत विचार केला तर दिवसेदिवस चोरींचा प्रमाण हा वाढत जात असून यावर आळा घालणे पोलिसांना अपयश येत आहे.या ठिकाणी पोलीस चौकी असून मात्र मागील दहा वर्षापासून बंद आहे. त्यामुळे याठिकाणी कोणताच कर्मचारी राहत नाही.
या चोरी बाबत वारंवार तक्रार करण्यात येत आहे मात्र चोरांचा काही थांगपत्ता लागत नाही आहे. सदर पोलीस चौकी सुरु करण्यात यावी अशीही मागणी वारंवार करण्यात आली होती.परंतु या मागणीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.याचा परिणाम आज नागरिकांना भोगावा लागत आहे. त्यामुळे सदर पोलीस चौकी हि त्वरित सुरु करा अन्यथा चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावातील नागरिक व व्यापारांनी दिला आहे.