ग्रामीण भागातील बोगस वाचनालय बंद करा. जनतेची मागणी.!
★ भ्रष्ट अधिकारी व निरीक्षक करतात टक्केवारी नुसार सेटिंग.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : लाखनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये लाखो रुपयाचा शासकीय अनुदान घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बोगस वाचनालय चालवल्या जात आहेत,काही वाचनालयामध्ये वाचकांना आवश्यक सुविधा उपलब्ध नाही,एकही व्यक्ती वाचनालयाचा लाभ घेत नसतांना देखील खोटे स्वाक्षऱ्या मारुन,अनाधिकृत दस्ताऐवज तयार करून,शासन प्रशासनाची फसवणूक जात आहे अशा वाचनालयाची सखोल चौकशी करून दोषी संचालकांवर गुन्हा दाखल करून सदर वाचनालय कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी माहिती देताना शेकडो सुजाण नागरिकांनी मागणी केली आहे.
शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी - शेतमजूर , कर्मचारी,विद्यार्थी,युवक व सर्वसामान्य नागरिकांना वाचनालयाच्या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि देशातील घडामोडीसह,संस्कार , शिक्षण,मार्गदर्शन,अभ्यास,सामान्यज्ञान अशा अनेक बौद्धिक विकासाकरिता तसेच सर्वांगीण प्रगती करिता शासनाने शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी वाचनालय उघडलेली आहेत,ह्या वाचनालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता काही वाचनालय अस्तित्वात नसताना सुद्धा,गरजेनुसार सुविधा,वृत्तपत्र,पुस्तकांचा साठा,फर्निचर,आणि इतर आवश्यक सुविधा नसताना सुद्धा वाचनालयासाठी लाखो रुपयाचा उलाढाल करून अनुदान दिले जात असल्याचे चावडीवरील चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा स्तरावरी काही भ्रष्ट अधिकारी,कर्मचारी, निरीक्षक यांचे टक्केवारी सेटिंग व संगनमताने बोगस वाचनालय संचालकांना सुगीचे दिवस लाभले आहेत तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन दोस्ती संचालकांवर कठोर गुन्हा दाखल करून चौकशी अंती अनाधिकृत लाटलेला निधी शासन जमा करून बोगस वाचनालय कायमस्वरूपी बंद करण्याची माहिती देताना शेकडो सुजाण नागरिकांनी मागणी केली आहे.