पोलिस निरीक्षक,राजेश खांडवे यांना अटक ; न्यायाधीशांना घरी जाऊन दिली होती धमकी.
★ चंद्रपूर कारागृहात रवानगी.
एस.के.24 तास
गडचिरोली : विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावल्याच्या प्रकरणात वादग्रस्त पोलिस निरीक्षक,कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईबाबत पोलिसांनी मोठी गोपनीयता बाळगली. चामोर्शी समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत २० एप्रिल रोजी पहाटे ठाण्यात बोलावून, लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण केल्याचा दावा सभापती,अतुल गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक, राजेश खांडवेंववर चामोर्शी येथील प्रथम वर्ग केला होता.
खांडवेंवर गुन्हा नोंदविण्या सह बडतर्फी च्या कारवाई साठी चामोर्शी त आंदोलन झाले होते. त्यानंतर गण्यारपवारांनी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली होती.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी. मेश्राम यांनी २० मे रोजी पो. नि. राजेश खांडवेंवर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, २५ में रोजी सकाळी पो.नि.खांडवे हे न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेले.माझ्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश का दिला,अशी विचारणा त्यांनी केली.न्यायाधीशांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
अपिलात जाण्याची संधी आहे,असे न्या. मेश्राम यांनी समजावले.मात्र, याउपर खांडवेंनी हुज्जत घालून धमकावले.याप्रकरणी पो.नि.खांडवेंविरुद्ध कलम ३२३, ३५३, ४५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
चंद्रपूर कारागृहात रवानगी : -
पो.नि.राजेश खांडवे यांना २ जून रोजी उपअधीक्षक साहील झरकर यांनी गडचिरोलीतून ताब्यात घेतले. दुपारी चामोर्शी न्यायालयात हजर केले.न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यानंतर खांडवेंची रवानगी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली. या कारवाईला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
झाले होते निलंबन : -
या घटनेनंतर पोलिस अधीक्षक,नीलोत्पल यांनी तातडीने वेगवान हालचाली केल्या.न्या. मेश्राम यांची गडचिरोली ठाण्यात फिर्याद नोंदवून गुन्हा चामोर्शी ठाण्यात वर्ग केला,त्यानंतर पो.नि.खांडवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.गुन्हा उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविला.