महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा ब्रम्हपुरी जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा ब्रम्हपुरी जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,०१/०६/२३ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा ,ब्रम्हपुरीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने ब्रम्हपुरी जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला आहे.ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी आम्ही सजग असून ब्रह्मपुरी शहरावर अन्याय होता कामा नये.शासनाने नविन जिल्हा करतांना ब्रह्मपुरीचा विचार अवश्य करावा,अशी आमची मागणी असून चिमूर,नागभिडच्या तुलनेत ब्रह्मपुरी कितीतरी पुढे आहे.

विद्यानगरी,क्रीडानगरी,आरोग्यनगरी म्हणून ब्रह्मपुरीचा लौकिक आजही कायम राहिला आहे,ही बाब लक्षात घेऊन जिल्हाच्या विचारासाठी ब्रह्मपुरी शहराचा विचार अवश्य व्हावा,अशी सर्वांची मागणी असून आमच्या संघटनेचा याला पाठिंबा आहे.


यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा ब्रम्हपुरीचे अध्यक्ष डॉ.रवी रणदिवे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. धनराज खानोरकर,कार्याध्यक्ष प्रा.संजय लांबे,उपाध्यक्ष राहुल मैंद सचिव नंदकिशोर गुड्डेवार,प्रशांत राऊत, मधुकर मेश्राम, प्रा.बिंजवे सर, अमरदीप लोखंडे,चंद्रशेखर सातव तथा सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी आपला सक्रिय पाठिंबा जाहिर केलेला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !