शासकीय औ.प्र.संस्थेत जागतिक योग दिन संपन्न.

शासकीय औ.प्र.संस्थेत जागतिक योग दिन संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कौशल्यम सभागृहात प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख मार्गदर्शक  ज्येष्ठ योगशिक्षिका सौ.प्रतिभा रोकडे,सौ.छाया मायकलवर,निदेशक रमेश रोडे, अतुल बांते, किशोर बोकडे,मनिष उंबरकर,मुख्य लिपिक अनिल भोगेकर ,सचिन भोंगळे, श्रीकांत माकोडे उपस्थित होते . प्रशिक्षक सौ. रोकडे आणि छाया मायकलवर यांनी  विविध योग वर्गाच्या निमित्ताने सर्व योग आसन- प्राणायामाची माहिती देऊन प्रशिक्षणार्थ्यांनी नियमितपणे योगा - व्यायाम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी दोन्ही योगप्रशिक्षकांचा परिचय करून दिला तसेच   आजवर योग विषयक कार्याचे कौतुक केले.


 विशेषतः योग दिनाचे महत्त्व समजावून दिले.  योग वर्गात मोठ्या संख्येत कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन कु. रिया पिपरीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक एन.एन. गेडकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कु. कोमल बावरे, हर्षल बडोले, साहिल बुलबुले आदींनी अथक परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !