अखिल कुणबी समाज मंडळाच्या वतीने स्नेहमिलन सोहळा ; लोकप्रिय खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अखिल कुणबी समाज मंडळाच्या वतीने स्नेहमिलन सोहळा ; लोकप्रिय खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.                           

अमरदीप लोखंडे -सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,०६/०६/२३ अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीने स्वागत मंगल कार्यालय येथे स्नेहमिलन सोहळा व चंद्रपूर- वणी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.           जागतिकीकरणाच्या अफाट लोकसंख्येच्या आणि विविध जाती धर्माच्या गर्दीत आपली एक स्वतंत्र ओळख आपल्या 'कुणबी' जातीने अधोरेखित केलेली आहे. कुणबी हा जगाचा पोशिंदा आणि अन्नदाता म्हणून उल्लेखिल्या गेला तरी अनेक क्षेत्रात त्याला अनुलेखाने संपविले जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात समाजाचे प्राबल्य निर्माण करण्यासाठी अखिल कुणबी समाज मंडळ, ब्रम्हपूरी ही संघटना मागील अनेक वर्षापासून कार्य करीत आहे.


समाजाच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी प्रबोधन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वसतिगृह, अभ्यासिका, व्यवसाय विषयक उपक्रम, उपवधू-वर परिचय, विवाह समारंभ यासारखे अनेक उपक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रम्हपूरी येथे प्रशस्त सभागृहाची नितांत आवश्यकता आहे.


याचाच एक भाग म्हणून अखिल कुणबी समाज मंडळाने सर्वानुमते एक जागा निश्चित केली असून या प्रकल्पासाठी मोठ्या निधीची गरज आहे. आपण समाजातील एक प्रतिष्ठित, समृद्ध आणि बांधिलकी जोपासणारे संवेदनशील व्यक्ती आहात. लोकसहभागातून उभ्या होणाऱ्या या कार्यात उदार अंतःकरणाने आपण सिंहाचा वाटा उचलून सामाजिक बांधिलकीचा आणि आपल्या उदारतेचा समाजाला परिचय द्यावा, 


असे कार्यक्रम प्रसंगी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ऋषीजी राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून  प्रमोदभाऊ चिमुरकर,किष्णाभाऊ सहारे,अँड. गोविदराव भेडारकर, ,प्रा.प्रकाशराव बगमारे, डाँ. सतिशभाऊ दोनाडकर,योगिराज कुथे,व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दामोधर शिंगाडे केले.संचालन  मुनिराज कुथे व आभार प्रदर्शन प्रेमचंद अवसरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीचे पदाधिकारी ,युवा मंडळ व समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू,कर्मचारी ,महिलावर्ग  तसेच कुणबी समाज बहुसंख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !