आमदार,विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून आवळगाव येथील निराधार महीलेला आर्थिक मदत.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,१८/०६/२३ ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील वासुदेव जराते वय 34 वर्ष हे आपल्या राहत्या घराच्या छतावरून पाय घसरून पडले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घरातील ते कर्ता पुरुष होते. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पश्चात असलेल्या 3 चिमुकल्या मुलांची पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना त्यांच्या पत्नीला आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
याची माहिती आवळगाव येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना माहिती देताच त्यांनी सदर महीलेला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना आर्थिक हातभार लागावा म्हणून आपल्या वतीने आर्थिक मदत दिली.
सदरची आर्थिक मदत देतांना युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले,ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिनकर चुधरी,मच्छीगंधा सोसायटीचे अध्यक्ष, बिसन दुमने,ग्राम काॅंग्रेस कमेटीचे सचिव अनिल कामडी हे उपस्थित होते.