महाराष्ट्र विद्यालय, आवळगाव शाळेचा निकाल ९५.०८ टक्के. ★ प्रणय तुमराव बानबले विद्यालयातून अव्वल स्थानी.

महाराष्ट्र विद्यालय,आवळगाव शाळेचा निकाल ९५.०८ टक्के.

★ प्रणय तुमराव बानबले विद्यालयातून  अव्वल स्थानी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,०३/०६/२३ नुकत्याच जाहीर झालेल्या नागपूर बोर्डाच्या एस.एस.सी. प्रमाणपत्र परीक्षेत महाराष्ट्र विद्यालय आवळगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर या शाळेचा निकाल 95.8% लागला असून प्रणय तुमराम बाणबले या विद्यार्थ्याने 85 टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. तसेच महेश सुरेश गिरडकर ७९.६० टक्के घेऊन द्वितीय तर आर्यन खेमराज बानबले यांनी ७८.६० टक्के गुण प्राप्त करून तृतीय स्थान पटकाविले.महाराष्ट्र विद्यालय आवळगाव या शाळेने उत्कृष्ट निकाल लावण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे.

विद्यालयात शिक्षकांची कमतरता असून सुद्धा अवघ्या बोटावर मोजणाऱ्या शिक्षकांनी हाडाची काडे करून अभ्यासाचे धडे देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावली ती विद्यार्थ्यांनी आत्मसात केली आणि म्हणूनच शाळेचा उत्कृष्ट निकाल लागला असे विद्यार्थ्यांचे पालक यांचे म्हणणे आहे.

लागलेल्या उत्कृष्ट निकालात मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे विद्यार्थ्यांना दिल्या गेलेले शैक्षणिक मार्गदर्शन आणि शाळेतील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी विद्यार्थ्यांना करण्यात आलेली मदत उत्कृष्ट निकाल लागण्यात भर टाकून गेली. अभ्यास कसा करावा आणि भविष्याच्या वाटचाली संबंधाने मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे आणि इतर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे,  विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे गाववाशी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !