शेतात काम करतांना शेतमजुराचा मृत्यू .

शेतात काम करतांना शेतमजुराचा मृत्यू.


विजय नरचुलवार - प्रतिनिधी


व्याहाड खुर्द : येथील शेतमजुराचा शेतात काम करत असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिलीप शामराव जंजलवार वय,५२ वर्ष असे मृत शेतमजुराचे नाव आहे.दिलीप जंजलवार हे व्याहाड खुर्द चे रहिवासी असून मिळेल ते शेतीमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. जंजलवार हे मागील ६ वर्षापासून शेतमजूर म्हणून किसान नगर या गावात रोजीने शेतीची कामे करायला जात असायचे.

सदर जून महिना सुरु होताच शेतकऱ्यांनी पारंपरिक धूळवाफेच्या पेरण्या सुरू केल्‍या आहेत.पावसाआधी पेरण्या केल्‍यास खरीप पीक हे जोमात व दर्जेदार येत असल्‍याची स्‍थानिक शेतकऱ्यांची धारणा आहे. पिकाच्या उगवणीसाठी वळवाचा पाऊस फायदेशीर ठरत कोंब येतात आणि या काळात हिरवी रोपे दिसू लागल्याने मोठ्या पावसात ती तग धरतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांची शेतीची मशागत हि काही पूर्णता झाली आहे तर काही ठिकाणी सुरुच आहे. 


जंजलवार हे शेतीच्या मशागतीच्या कामाकरिता किसान नगर येथे सकाळच्या सुमारास गेले होते. पूर्ण दिवसभर शेतीच्या मशागतीच्या काम करत असतांना अचानक सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !