अहिल्याबाई होळकर स्मृती सभागृहासाठी सहा कोटी मंजूर - चंद्रपूर ला सर्वाधिक निधी.
नितेश मँकलवार - उपसंपादक
चंद्रपूर : पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर स्मृती सभागृहासाठी सहा कोटी मंजूर झाले असून सहा गावात हे सभागृह बांधली जाणार आहेत. ही निधी मिळावी याकरीता माजी खासदार डॉ विकास महात्मे यांनी ग्रामविकास विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्ताव धनगर समाज संघर्ष समितीचे विभागीय अध्यक्ष.डॉ.तुषार मर्लावार, जिल्हाध्यक्ष संदीप शेरकी,धनगर समाजाचे कार्यकर्ते विजय कोरेवार यांनी दिला होता.राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचे जयंती दिनाचे पूर्व 24 मे रोजी महाराष्ट्रातील ग्रामविकास विभागाने 50 कोटी निधीतुन 50 गावासाठी सभागृह मंजूर केले आहे.
त्यात जळगाव जिल्ह्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याट 6 सभागृह असून सावली तालुक्यातील खेडी,मुल तालुक्यातील बेंबाळ,गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी,सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, कोरपना तालुक्यातील थूटरा व वरोरा तालुक्यातील टेम्भूर्डा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती सभागृह मंजूर झाले आहे.
प्रत्येक गावात सभागृह मंजूर करण्यासाठी धनगर समाज संघर्ष समिती प्रयत्न करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 6 सभागृह मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी शासनाचे आभार मानले आहे.