कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे शेतकऱ्यांना शेती उपयोगी महत्वाच्या साहित्य स्प्रेपंप, ताळपत्री,वाटप.

कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे शेतकऱ्यांना शेती उपयोगी महत्वाच्या साहित्य स्प्रेपंप, ताळपत्री,वाटप.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : कृषी उत्पन्न बाजार समिती,मूल व जल जीवन फाऊंडेशन पिवोटल इंडिया फार्मर प्रोडयूसर कंपणी यांचे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट उत्पादक कंपनी कडून तत्वावर अत्यंत कमी दरात ताडपत्री,बॅटरी स्प्रेपंप,चैन सा तसेच, शेतीला उपयोगी असणाऱ्या साहित्याचा “विक्री शिबीर” दिनांक 20/06/2023 रोज मंगळवारला शेतकरी भवनात आयोजित करण्यात आला असून नवनियुक्त कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार यांनी आपले संचालक मंडळ नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे व फायद्याचे काम करेल असे आश्वासीत केले होते.

त्यानुसार संचालक मंडळाने ऐन शेती हंगामाच्या सुरवातीस कंपनीशी संपर्क साधून थेट उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून अतिशय कमी दरात शेती उपयुक्त साहित्य उपलब्ध करुन प्रत्यक्ष  प्रथम शेतकरी आनंद आक्केवार यांना व लगेच इतर शेतकऱ्यांना वाटप केले.                                                        


या प्रसंगी सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार ,माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर यांनी  आमचे नेते मार्गदर्शक मा.संतोषभाऊ रावत, अध्यक्ष,जिल्हा मध्यवर्ती सह.बॅक,चंद्रपूर व माजी जी.प.अध्यक्ष  यांचे मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबऊन शेतकऱ्यांचे हित साधेल असे मार्गदर्शन सुद्धा विचार व्यक्त करतांना केले. आणि ज्या शेतकऱ्यांना शेती साहित्य पाहिजे त्यांची नोंदणी सुद्धा करुन घेतली.      वाटप केले जाणारे शेती साहित्य व त्यांची किंमत, दर्जा, बाजार भावापेक्षा कमी भाव कसा याबाबत कंपनीचे डायरेक्टर प्रियांक बोरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना डेमो देऊन समजाऊन सांगितले.संचालन शहर काँग्रेस अध्यक्ष,सुनील शेरकी यांनी केले.                                       


साहित्य वाटप करतांना बाजार समिती संचालक संदीप कारमवार,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष,गुरु गुरनुले,माजी संचालक धनंजय चिंतावार,संचालक सुमित आरेकर, हसन वाढई,अमोल बच्चुवार, राहुल मुरकुटे,चंदा कांमडे, उषा शेरकी, तुलाराम घोगरे,जालिंदर बांगरे,रमेश बरडे,सचिव अजय गंटावार उपस्थित होते.तसेच साहित्य खरेदी करण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बाजार समिती कर्मचारी राजू गेडाम,अंकुश नागोशे व इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !