अक्षय भालेराव यांची हत्या करणाऱ्यांना मृत्यु दंडाची शिक्षा दया. ; बुध्दिष्ठ समाज सघंर्ष समितीची मागणी.
★ मुख्यमंञी यांना निवेदन ; तहसिलदार लाखांदुर मार्फत यांना निवेदन सादर.
नरेंद्र मेश्राम - भंडारा
भंडारा : नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील बहुजन आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ता अक्षय भालेराव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्याचां मनात राग धरून जातीवादी समाज कंटकाकडून अक्षय भालेराव यांची निर्गुण हत्या करण्यात आली सदर घटना आहे मानवतेला कालीमा असणारी आहे या घटनेच्या आम्ही बुध्दिष्ठ समाज संघर्ष समिती लाखांदूरच्या वतीने निषेध करत आहे.
व त्यांच्या खालील मागण्यात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी तथा 50 लाख रुपये मदत देण्यात यावे, संबंधित प्रकरणातील फिर्यादीला व साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे तसेच मयत अक्षय ची आई वडील व भावंडाच्या इच्छेनुसार समाज कल्याण विभागाने सरकारी वकीला बरोबर दुसरा एक वकील द्यावा ,अकार्यक्षम गृहमंञी यांना पदावरुन हटविण्यात यावे या मागणीचे निवेदन बुध्दिष्ठ समाज संघर्ष समिती तालुका लाखांदुर यांच्यावतीने लाखांदुर तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे.
निवेदन सादर करतांना मुख्यसयोजक चंद्रशेखर टेंभूर्णे ,सल्लागार प्रा.अनिल कानेकर ,तालुका अध्यक्ष संदिप मोटघरे,मनोज बंन्सोड ,बबन गजभिये,रहिम मेश्राम,हरिदास खोब्रागडे ,प्रकास बारसागडे,तिरुताई मेश्राम, जोतीबा रामटेके,बिंदु रामटेके ,जगधिस रंगारी,धर्मराज रामटेके, व्यकंट मेश्राम, संदेश खोब्रागडे, विजय मेश्राम व इतर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते .