चला जानूया नदीला.या उपक्रमात ग्रामपंचायत जेप्रा व मॅजिक बस जेप्रा यांनी पटकावला प्रथम क्रमांक.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक 17 जून 2023 ला. जेप्रा ग्रामस्थ,ग्राम पंचायत जेप्रा जि.प.उच्च प्राथमिक शाळा जेप्रा व मॅजिक बस जेप्रा यांच्या संतुक्त विद्यमाने ' चला जानूया नदीला ' हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा अंतर्गत गावामध्ये नदिवरू पाणी आणून भजनानी व लेझिम पथकांनी कलश यात्रा काढण्यात आली, त्या नंतर जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात भव्य सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.त्यात गीत गायन,नृत्य,निबंध,झाकी,चित्रकला इत्यादी स्पर्थ्येचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक - श्री.मा.गणवीर सर तहसीलदार गडचिरोली.अध्यक्ष- सौ.शशिकलाताई झांझळ सरपंच ग्रामपंचायत जेप्रा.
प्रमुख अतिथी- श्री हेपट सर चला जानूया नदीला अभियान प्रमुख,श्री मनोहरजी झंझाळ माजी सभापती गडचिरोली सौ.कुंदाताई लोणबले उपसरपंच जेप्रा,श्री वामन गडपयाले पोलीस पाटील जेप्रा श्री, वासुदेव गावतुरे तंटामुक्ती अध्यक्ष जेप्रा.श्री बांबोले सर मुख्याध्यापक जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा,श्री आदे सर,श्री पिंपडकर सर,सौ. हर्षे मॅडम सौ. गूळदे मॅडम सौ.कोवे मॅडम.श्री विनोद चूनारकर. श्री अतुल नक्षिने सदस्य ग्राम पंचायत जेप्रा. श्री नरेश चुदरी श्री खुमेश हर्षे ग्राम पंचायत कर्मचारी जेप्रा श्री. लेखाराम हुलके जीवन कौशल्य शिक्षक व अनिल खोब्रागडे विषय शिक्षक मॅजिक बस जेप्रा यादी मान्यवर उपस्थित होते.
हा अभियान संपूर्ण गडचिरोली जिल्यात राबवण्यात आला आणि या अभियानाचा समारोप आज दिनांक 21 जून रोज बुधवारला जिल्हा अधिकारी कार्यालय गडचीरोली येथे संपन्न झाला. विशेष म्हणजे या आभियांत गडचीरोली तालुक्यातून जेप्रा या गावांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि मॅजिक बस च्या विद्यार्थ्यांनीनी नृत्य या स्पर्थ्ये प्रथम क्रमांक पटकावला.
प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल प्रोत्साहन मनून ग्राम जेप्रा व प्रथम क्रमांक पटकावनाऱ्या विद्यार्थिनीना चला जानुया नदीला या अभियानाचे समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख मा.श्री. डॉ.राजेंद्र सिंग जलपुरूष रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त.यांच्या हस्ते शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाला मा.श्री.अशोक नेते खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र.मा.श्री डॉ. देवराव होळी आमदार गडचिरोली.मा.श्री कृष्णाजी गजभिये आमदार आरमारी. मा.श्री. डॉ.परशुराम खूने पद्मश्री पुरस्कार प्राप्त नाट्य व कला क्षेत्र मा.श्री.डॉ.किशोर मानकर मुख्य वनसंरक्षक गडचिरोली.मा.श्री.संजय मिना जिल्हा अधिकारी गडचिरोली आदी मान्यवर उपस्थित होते.