महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव,(भोसले) विद्यालयाचा निकाल ९१.७८ टक्के ★ कु.प्रीती एकनाथ पारधी ठरली विद्यालयातून प्रथम.

महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव,(भोसले) विद्यालयाचा निकाल ९१.७८ टक्के


कु.प्रीती एकनाथ पारधी ठरली विद्यालयातून प्रथम.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,२/०६/२३ आज घोषित झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक एस.एस.सी बोर्ड नागपूरच्या निकाल पत्रात महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले) तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर या शाळेचा निकाल ९१.७८ टक्के लागला असून पहिल्या तीन मध्ये येण्याचा मान मुलींनी पटकविला आहे यात कुमारी प्रीती एकनाथ पारधी ८४.४० टक्के कुमारी प्रतीक्षा मधुकर मेश्राम व अश्विनी सिद्धम मेश्राम ८२ टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्राविण्य प्राप्त केले आहे.


विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ओ.एम.बगमारे यांचे विद्यार्थ्यांप्रती असलेले योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनात त्यांचे सहकारी शिक्षक यांनी घेतलेली मेहनत आणि परिश्रम यांचे फलीत शाळेच्या लागलेल्या उत्कृष्ट निकालने दिसून आले.


शाळेच्या लागलेल्या उत्कृष्ट निकालाबद्दल आणि प्राविण्य प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे गावकरी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !