अ-हेरनवरगाव ग्रामपंचायत च्या कारभाराची चौकशी करा. - ग्रामपंचायत सदस्यांची मागणी.
★ अन्यथा कायदेशीर मार्गाने जाऊन ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा ; ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.
★ ग्रा.पं.सदस्यांची पत्रकार परिषदेत माहिती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२०/०६/२३ ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्वात मोठ्या १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत मध्ये येणारी अ-हेरनवरगाव ग्रामपंचायत आहे. येथील इतिहासात कधी नव्हे मात्र आता या ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून ग्रामपंचायतच्या शासकीय रकमेची अफरातफर करत येथील सरपंच्या सौ. दामिनी जागेश्वर चौधरी व सचिव रातीराम चौधरी हे हिटलर शाही पद्धतीने मनमानी कारभार करत आहेत.
त्यामुळे ग्रामपंचायत कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.अशी मागणी अ-हेरनवरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी, मुख्याधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनातून आणि पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे तक्रार करून केली आहे.
अ-हेरनवरगाव येथील सरपंच सौ.दामिनी जागेश्वर चौधरी व ग्रामविकास अधिकारी रतिराम चौधरी यांनी एकमेकांच्या संगनमताने ग्रामपंचायतच्या आर्थिक कारभारात घोळ करून कामावर न आलेल्या विविध व्यक्तींच्या नावे खोटे मस्टर तयार करून हजारो रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले व ते पैसे संबंधित व्यक्तींकडून वसूल करून अफरातफर केल्याने सरपंच व सचिव यांनी केलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दैनंदिन गुजरी व आठवडी बाजार दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लिलाव करण्यात आला मात्र लिलाव झाल्यानंतर संबंधित लिलावधारकाने झालेला ठेका काही दिवसांनी सोडला त्यानंतर 4 ते 5 दिवस ग्रामपंचायत मार्फत वसुली सुरू करण्यात आली . वसुली झालेल्या पैशाचा काही हिशोब नाही .नंतर मात्र ग्रामपंचायत चा ठराव न घेता सरपंच्या सौ. दामिनी चौधरी व सचिव रातीराम चौधरी यांनी सरपंच्या सौ. दामिनी चौधरी यांचे वडिल ऋषी बठे यांना परस्पर कोणताही ठराव अथवा स्टॅम्प न लिहिता ठेका देण्यात आला.व वसुली सुरु केली.
याची याबाबत ची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.ग्रामपंचायत ला लागणारे साहित्य हे कोणतीही जाहिरात किव्वा चावळीवर नोटीस न लावता ग्रामपंचायत सचिव आपसी संबंधांतून व आर्थिक व्यवहार करून बाजार भावापेक्षा जास्त दराने दरपत्रक आणुन ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये मंजूर न करता स्वमर्जीने खरेदी करत आहेत.
ग्रामपंचयत एजन्सीच्या नावाखाली ठेकेदारी पद्धतीने कमी दरात गावातील बांधकामाचे काम स्वतःकरत असून त्याचा झालेला नफा ग्रामपंचायतच्या सामान्य फंडात जमा करण्यात येत नसून स्वतः जवळीक व्यक्तींच्या नावावर पैसे उचलून स्वतःचे खिशे भरण्याचे काम येथील सरपंच व ग्रामसेवक करीत आहेत. ग्रामपंचयत कार्यालयात गावात पाणीपुरवठा करणारा शिपाई असतांना सरपंच दामिनी चौधरी यांनी स्वतःच्या भावालाच मासिक वेतनावर पाणीपुरवठा करण्यासाठी नेमणूक केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
ग्रामपंचायत सामान्य फंडातून देण्यात येणाऱ्या 5 टक्के अपंग निधीचे सचिव व सरपंच यांनी कसलाही ठरव अथवा ग्रामसभा न घेता परस्पर फक्त 4 व्यक्तींना पैसे वाटप केले असून इतर अपंग व्यक्तींना डावलण्यात आले.याबाबद मासिक सभेत विचारणा केली असता शासनाकडून फक्त चार व्यक्तींना निधी देण्याचा परिपत्रक आला असल्याचे सांगितले मात्र परिपत्रक मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली.
तसेच अनुसूचित जातीच्या येणाऱ्या शासकीय निधीबाबत विचारणा केली असता त्या निधी संबंधाने बोलायचे नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.ग्रामपंचायत सदस्या सौ.सविता राहुल देवढंगले ह्या जवळपास दीड वर्षांपासून कोणतीही पूर्व कल्पना न देता मासिक सभेला गैरहजर असताना तिला अपात्र करण्याचा ठराव पारित असून सुद्धा वरिष्ठांकडे त्याची माहिती पाठविली नाही.
याबाबद मुख्याधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांची प्रत्येक्षात भेट घेतली यांनीअसता सचिव चौधरी यांनी कसलाही अहवाल सादर न केल्याचे सांगितले.याबाबद येथील सचिव रातीराम चौधरी यांना विचारणं केली असता त्यांनी मला वेळ मिळेल तेव्हा मी अहवाल पठावेन असे मासिक सभेत सांगितले.
ग्रामपंचयत कार्यालयात दाखल्यांसाठी किव्वा वैयक्तिक कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी येथील ग्रामसेवक अनादराने मोठ्याने बोलून सर्वसामान्य माणसाचं आवाज दाबण्याचा प्रयत्न करून त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. गावातील गरजू व्यक्तींना लागणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दाखल्यांसाठी दिवसेंदिवस ताटकळत राहावे लागते.कोणतेही कारण नसताना येथील सचिव आपल्या पदाचा पूर्णतः गैरवापर करून गावातील नागरिकांना नोटीस पाठवून मानसिक त्रास देत आहेत.
एकंदरीत येथील ग्रामपंचायत सरपंच्या सौ.दामिनी जागेश्वर चौधरी व सचिव रातीराम चौधरी हे कोणतेही ठराव न घेता मनमर्जीने ग्रामपंचायत कारभार करत असून लाखो रुपयांची अफरातफर करून भ्रष्टाचार करत मनमानी कारभार करत आहेत. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाने शासनाचे परिपत्रक असून सुद्धा सचिव सरपंच यांनी देश भावनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्राम पंचायत कार्यालयामध्ये सादर केली साजरी केली नाही आणि त्याचे फोटो गव्हर्नमेंट दिलेल्या वेबसाईट वरती अपलोड केलेले नाहीत तसेच महाराष्ट्र दिनी झेंडा वंदन सुद्धा त्यांनी केलेला नाही.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेवरती शासनाने दिलेल्या निधीचा गैरवापर करीत हुकूमशाही पद्धतीने आपल्याच मर्जीने शासनाच्या निधीचा वापर केला आहे हे दाखविण्यासाठी थातूरमातूर सार्वजनिक मुत्रीघर बांधलेले आहे. त्यामुळे त्या सार्वजनिक मुत्रीघराचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कोवळ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती येणाऱ्या , सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होत असून त्यांचे शिकण्याकडे लक्ष लागत नाही.
त्यामुळे सरपंच व सचिव हे कधीच असलेल्या ग्रामपंचायतीच्या आर्थिक सामाजिक हिताच्या आणि शासकीय योजनांची न करण्यात येणारी परिपुर्तता घरकुल वाटपात गैर कारभार या सगळ्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाही करण्याची मागणी केली असल्याची माहिती येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिलारे,जितेंद्र कऱ्हाडे,प्रतिभा राऊत,ज्ञानेश्वरी ठेंगरे,निशा ठेंगरे,चंद्रकांत गाताडे,सरिता उरकुडे यांनी ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.