स्व - जागरणाचा पावन दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक. ★ ब्रह्मपुरी येथील हिंदू साम्राज्य दिनी गोविंदजी शेंडे यांचे प्रतिपादन.

स्व - जागरणाचा पावन दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक.


★ ब्रह्मपुरी येथील हिंदू साम्राज्य दिनी गोविंदजी शेंडे यांचे प्रतिपादन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक, ०३/०६/२३ भारतात अनेक राजे महाराजे झाले पण सामान्य जनतेचे सत्व जागृत होऊन स्व- धर्माची आणि स्वातंत्र्याची  प्रेरणा देणारा हा दिवस आहे असे येथील हिंदू साम्राज्य दिन उत्सव समिती तर्फे घेण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त झालेल्या हिंदू साम्राज्य दीनोत्सव यात बोलताना गोविंदजी शेंडे यांनी प्रतिपादन केले.सायंकाळी ६ वाजता स्थानिक वीर सावरकर चौक येथून शिवरायांच्या रथाची भव्य शोभायत्रा निघाली यात ब्रम्हपुरी शहरातील ७ वस्ती मधील देखाव्यांचा सहभाग होता.

लहान लहान बाल गोपाल शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगातील वेशभूषेत सहभागी झालेले होते. रथ, वाद्यपथक,अश्व, दिंडी असे विविध पथक तसेच हनुंमान मंदिर पटेल नगर, महिला मंडळ, धुम्मनखेडा वार्ड, तरुण गणेश मंडळ, जाणी वार्ड, संत रविदास महाराज मंडळ,हिंदू ज्ञान मंदिर,ब्रम्हपुरी, सर्वस्पर्शी संस्था, रा. स्व. संघ पर्यावरण गतिविधि यांचे विशेष रथ आकर्षणाचे केंद्र बिंदू होते. 

गणेश लांजेवार प्रशिक्षण केंद्राचे मर्दानी कला पथकाचा स्थानिक तरुणांचा थरारक प्रात्यक्षिके ब्रम्हपुरीकरांनी प्रथमच अनुभवले.शोभायात्रेचे शेवटी शिवराज्याभिषेक सोहळा झाला त्यात स्वप्नील भोसले अँड ग्रुप यांनी विविध गीते सादर केली.

शिवरायांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक झाल्यानंतर गोविंदजी शेंडे यांचे व्याख्यान झाले यात  ३५० वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा ह्या देशात जेंव्हा पडत नव्हतं तेंव्हा एका राजाने स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती. त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्रज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हे महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होती ह्यात शंका नाही असे म्हणाले.


यावेळी व्यासपीठावर उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्रजी आष्टेकर आणि संयोजक लेफ्ट प्रा अभिजीत परकरवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी पी.एम एस फाउंडेशन च्या विद्यार्थी यांनी शिवराज्याभिषेक ही नाटीकाप्रस्तुत केली. यावेळी प्रमुख उपस्थित माजी आमदार,अतुलभाऊ देशकर, खासदार अशोक नेते,सत्यसाई मंडळाचे जिल्हा प्रमुख सपाटे साहेब,पतंजली चे जिल्हा प्रमुख भगवानजी पालकर,गायत्री परिवार युवा जिल्हा प्रमुख मदनकर सर, विहीप चे राजू ठाकरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख नरू नरड,अमोल माकोडे, प्रकाशजी बगमारे रा. स्व संघाचे तालुका कार्यवाह हरिदास दोनाडकर असे विविध मान्यवर उपस्थित होते तसेच ब्रम्हपुरीकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्ट प्रा अभिजीत परकरवार, आभारप्रदर्शन प्रा,सुयोग बालबुधे यांनी तर संचालन कु समिधा पेशट्टीवार हिने केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !