खाजगी रुग्णालयात दरफलक रुग्णहक्क सदन लावा. - रुपेश देशमुख

खाजगी रुग्णालयात दरफलक रुग्णहक्क सदन लावा. - रुपेश देशमुख 


खाजगी रुग्णालयात उपचाराचे दरफलक न लावल्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,२४/०६/२३ ब्रम्हपुरी शहरात अनेक मल्टीस्पेशलिटी खाजगी रुग्णालय आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते,मात्र याच खाजगी रुग्णालयात अनेक रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून शहरातल्या खाजगी रुग्णालयात रुग्णांना भरती केल्या जाते.मात्र अश्या खाजगी बऱ्याच तक्रारी समोर येत आहेत.


महत्वाची बाब म्हणजे दरफलक,रुग्ण सनद फलक लावणे हे होय.ब्रम्हपुरी शहरातच नव्हे तर ब्रम्हपुरी ग्रामीण भागात बहुतांश खाजगी रुग्णालयात उपचाराचे दरफलक न लावल्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट केल्या जात आहे. जसे उपचाराचे वाढीव बिल लावणे, जादा दर आकारणे औषधी डॉक्टरांचीच असलेल्या मेडीकल स्टोर मधून घेण्याची सक्ती करणे असे प्रकार सर्रासपणे ब्रम्हपुरी खाजगी रुग्णालयात होत आहेत.


यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने सर्व खाजगी रुग्णालयाच्या आवारात दरफलक लावण्याची सक्ती करावी जेणेकरून रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयातील विविध दरांची माहिती होईल आणि त्यानुसार बिल अदा करतील. शासनाच्या अध्यादेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करावी व अशा खाजगी रुग्णालयांचे परवाने रद्द करावेत. शहरातील प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राइट्स) ची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे.


शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये रुणांच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही. खाजगी रुग्णालयात आता रुग्णहक कायद्यानुसार उपचार व रुग्णसेवांचे दर पाची माहिती मिळाली पाहिजे. ही माहिती रुग्णांना व त्यांच्या परिवारांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढलेला आहे. 


परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. सदमध्ये रुग्णाला प्राप्त झालेले अधिकार, जानासच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क आदीचा समावेश आहे. त्यामुळे ब्रम्हपुरीतिल सर्व खाजगी रुग्णालयांना रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक लावण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी रुपेश देशमुख यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !