जी.ई.एस.हायस्कुल मधुन रुची खंडारे प्रथम
नरेंद्र मेश्राम
भंडारा : लाखनी तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या केसलवाडा ( वाघ.) येथील जी.ई.एस. हायस्कुल मधील रुची अनार्थ खंडारे ह्या विद्यार्थिनीने बोर्डाच्या परीक्षेत एकूण ४२९ गुण घेऊन ८५.८० टक्केवारीने शाळेमधून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे , तिने आपल्या यशाचे श्रेय आई , वडील आणि गुरुजनांना दिले असून शाळेमध्ये व लाखनी तालुक्यात रुची खंडारे ह्या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात असून विद्यालयाचे मुख्याध्यापक हरीष कापगते,वर्गशिक्षक नितीन टेंभुरकर ,नितीन वाघये यांनी विद्यार्थिनीच्या घरी जाऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत हे विशेष.