आंबाडी ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजणा ठरते रोजगार व कृषी विकासाचा आधार.
नरेंद्र मेश्राम - भंडारा
भंडारा : नजीकच्या आंबाडी येथील गट ग्रामपंचायत अंतर्गत गीरोला, आंबाडी, पालगाव येथील कृषी व्यवसाय संपण्याच्या मार्गावर असून परपंचाच्या उपजिविकेसाठी येथील महिलांना बाहेर गावी शेती कामासाठी जावे लागते महाराष्ट्रातील खंड विकास अधिकारी संघटनांच्या बहिष्कारामुळे मनरेगाचा काम सुरू करण्यास विलंब झाला पण जसे ही संप मागे घेण्यात आले तसे आंबाडी ग्रामपंचायत सरपंच यांच्या पुढाकाराने मोठया संख्येने बेरोजगार पुरुष व महिला मंडळी ने रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी धाव घेतले.
यावेळी भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे,यांनी रोहयो कामाला भेट दिली मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या मजू रांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ऑनलाईन प्रक्रिया पॅनल ने करन्याच्या सूचना दिल्या व सर्व मजुरांनी नियमांनी वध्या तयार करुन रस्त्यावर जास्तीत जास्त माती काम दिसले पाहिजे त्यासाठी मजुरांनी प्रामाणिक पने काम करुन योजना यशस्वी करण्याचे निर्देश दिले.भंडारा पंचायत समिती च्या खंड विकास अधिकारी डॉ.संघमित्रा कोल्हे, यांनी मजुरांना उनीचा तडाखा बसू नये.
म्हणून मंडप व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूचना दिल्या उन्हाची वेळ टाळून सकाळीं सहा ते बारा व चार ते सहा अश्या वेळेत काम करून घ्या अश्या सूचना दिल्या.या वेळी नायब तहसिलदार निंबार्ते, मनरेगा पॅनल अभियंता दिनेश वाडीभस्मे अभियंता कुर्वे, सरपंच भजन भोंदे यांनी आंबा डी ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे करण्यासाठी मी कटीबध्द असल्याने येणाऱ्या योजनाचा लाभ ग्रामस्थांना त्यांच्या हक्कासाठी व सुविधेसाठी कीतीही अडचणी आल्यातरी कामे करत राहण्याचे आश्वासन दिले.
रोजगार सेवक सुधाकर बावनकर,यांच्या मार्गदर्शनात या वेळी आंबाडी पालगाव सिमांकन भागातील मारबात धोडी ते एरिकेशन कॉलनी क्यानल रस्ता पर्यंत पांदन रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा गट नेते विनोद बांते,पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी,ग्रामपंचायत सदस्य मनोहर धुर्वे, अमीर बोरकर, सौ. कुंदा साखरवाडे, पोलिस पाटील भगवान साखरवाडे,ग्रामपंचायत पंप ऑप्रेटर सुखदेव मारबते, मजुर मेट सत्यकला बावनकर गिता बोरकर, प्राची भुरे, पल्लवी भुरे, वंदना अनिल बावनकर, रामेश्वर साखरवाडे उपस्थित होते यावेळी अंदाजे साडे चारशे मजुर उपस्थित होते.