कळमना येथे अहिल्यादेवी होळकर जयंती संपन्न.

कळमना येथे अहिल्यादेवी होळकर जयंती संपन्न. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस,ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई  हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्य कावळे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, ग्रा,प,सदस्य,दिपक झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, सुनिता उमाटे,रंजना पिंगे, ज्येष्ठ नागरिक रामजी सराफ,ग्रामसेवक नारनवरे इतर मान्यवर उपस्थित होते.  


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त ग्रामपंचायत सदस्य रंजना पिंगे, ग्रामसघाच्या अध्यक्ष मिना भोयर कार्यक्रमाकरिता गामसघ अध्यक्ष मिना भोयर, निता पेंदोर, मिनाक्षी मोडघरे यांचा सामाजिक कार्य केल्याबद्दल शाल,क्षिफळ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई यांनी पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यक्तीमत्व व कार्याचा गौरव सांगितला,सर्वांनी त्यांचा कार्याचा वसा घेतला पाहिजे व तो आचरणात आणून आपले जीवन समृद्ध केले पाहिजे असे मत व्यक्त केले. 


कार्यक्रमाला सुचीता धांडे,मायाबाई निमकर,सुनिता वाढई, लता क्षिरसागर,इंदिरा मेश्राम, नानेबाई वसाके,अस्मिता गेडाम,शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावण गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन सुचीता धांडे यांनी केले.कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने गावकरी उपस्तीत होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !