महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिरोली जागतिक योग दिवस संपन्न.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दिनांक,21/6/2023 ला महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय,चिरोली ता,मुल जिल्हा,चंद्रपूर वतीने मुख्याध्यापक,श्री,लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री,लोखंडे सर,गळमळे सर,डोर्लिकर सर,नाकाडे सर,निकुरे सर समरीत सर,मेश्राम सर, कामीडवार मॅडम,लांजेवार मॅडम,शिंदे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विविध योग वर्गाच्या निमित्ताने सर्व योग आसन- प्राणायामाची माहिती देऊन प्रशिक्षणार्थ्यांनी नियमितपणे योगा - व्यायाम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. विशेषतः योग दिनाचे महत्त्व समजावून दिले.योग वर्गात मोठ्या संख्येत कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.