जांभळी येथे बालविवाह यावर जनजागृती स्पर्श संस्थेचा उपक्रम.

जांभळी येथे बालविवाह यावर जनजागृती स्पर्श संस्थेचा उपक्रम.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


धानोरा : तालुक्यातील जांभळी येथे बालविवाह यावर जनजागृती करण्यात आली  बालविवाह सामाजिक रितीरिवाज , शिक्षणाचा अभाव मुलींकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेता आजही समाजात बालविवाह होताना दिसून येत असून त्यावर आळा घालण्याकरिता स्पर्श गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील 50 गाव बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प केला असून त्यावर जांभळी येते मार्गदर्शन व रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये बालविवाह यावर जनजागृती करण्यात आली 


एवढी कार्यक्रमाचे अध्यक्ष बावणे उपसरपंच ग्रामपंचायत जांभळी यांनी बालकांची काळजी व संरक्षणासाठी लवकरच ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करणार असल्याचे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक श्री इतिहास मेश्राम प्रकल्प व्यवस्थापक स्पर्श यांनी बालक ही आपल्या गावाची संपत्ती असून त्यांचं काळजी व संरक्षण आपली जबाबदारी आहे असे सांगितले प्रमुख अतिथी अर्जुन वार साहेब यांनी बालविवाह मुक्त गाव याला समर्थन दर्शविला श्री लुकेश सुमनकर क्षेत्र समन्वयक स्पर्श गडचिरोली यांनी बालविवाह कारणे व होणारे नुकसान सांगितले मार्गदर्शन कार्यक्रम पार पाडल्यानंतर जांभळी गावामध्ये रॅलीच्या माध्यमातून बालविवाह मुक्त गाव करण्याचा संकल्प नागरिकांनी केला.


यावेळी जांभळी येथील सरपंच उसेंडी साहेब, तलाठी मेश्राम मॅडम,सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे संचालन,वैभव सोनटक्के क्षेत्र अधिकारी तर आभार लोकेश सोमणकर क्षेत्र समन्वयक यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !