भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची उत्कृष्ट तालुकास्तरीय गुणवत्ता विकास कार्यशाळा.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय शिक्षण परिषद व गुणवत्ता विकास कार्यशाळा तथा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक ,उच्च प्राथमिक ,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापकांची सभा रॉयल पब्लिक स्कूल भंडारा येथे उत्कृष्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, नवीन सत्राच्या प्रारंभी शाळा स्तरावरील पूर्वनियोजन गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने विविध महत्त्वाच्या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
यात तालुकास्तरीय शिक्षण परिषदेचे तथा गुणवत्ता विकास कार्यशाळेचे उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक चे रवींद्र सोनटक्के हे होते तर अध्यक्ष स्थानी रॉयल पब्लिक स्कूल चे सचिव मधू श्यामुअल, व्यासपीठावर उपस्थित होते.
तर अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे ,केंद्रप्रमुख गिरीधारी भोयर,वसंत साठवणे, सुधाकर कंकलवार,भीमराव मेश्राम , पुष्पलता भोयर ,सौ सुजाता रामटेके,झाशिराम पटोले, रवींद्र फंदे, गोस्वामी, रॉयल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका ओमना श्यामुल, शाळेचे व्यवस्थापक रोशन श्यमुआल प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी भंडारा पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यशाळेचा उद्देश्य विषद करून गुणवत्ता वाढीसाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोरलीकर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा चे रवींद्र सोनटक्के यांनी वेळोवेळी सभेत दिलेल्या सूचनांची माहिती उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना दिली.
या प्रसंगी जिल्हापरिषद भंडारा चे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी आपल्या भाषणातून स्वतः अनुभवलेले प्रसंग आणि त्यामधून अनेक भावनिक आणि मार्मिक संदेश देऊन गुणवत्ता वाढीसाठी जीवओतून तळमळीने काम करण्याचे मुख्याध्यापक व परिवेक्षीय यंत्रणेला आवाहन केले, जिल्हा शिक्षणाचे पवित्र कार्य एकूणच गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगीतले.
तसेच सर्व विषयावर आपल्या विस्तृत मार्गदर्शनातून प्रकाश टाकला या प्रसंगी गिरधारी भोयर यांनी शाळा पूर्व तयारी,शाळा पूर्व नियोजन,नवभारत साक्षरता मोहीम व वर्षभर करावयाच्या कामाची माहिती उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना दिली,देवानंद घरत यांनी निपुण भारत या विषयावर मार्गदर्शन केले, तर भीमराव मेश्राम यांनी शाळा स्तरावरील विविध योजना विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांचे संचालन कुंडले,व बाभरे यांनी उत्कृष्ट संचालन करून सभा यशस्वीरित्या पार पाडली सभेची पूर्वतयारी आणि यशस्वीतेसाठी बीआरसी स्तरावरील विषय साधन व्यक्ती रामकृष्ण वाडीभस्मे,कु.हेमलता सरादे अश्विन रामटेके,वंदना हुमने, भेनडारकर,सुरेश कोरे यांनी सहकार्य केले सुजाता बागडे यांनी सर्वांचे आभार मानले व वंदे मातरम् या गीताने या कार्यशाळेची सांगता झाली तसेच सर्व विशेष शिक्षक,साधन व्यक्ती, गट साधन व्यक्ती, केन्द्र प्रमुख यांनी परिश्रम घेतले.