बकरी चारण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला गुडेगाव येथील प्रकरण.

बकरी चारण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला गुडेगाव येथील प्रकरण.


नरेंद्र मेश्राम : भंडारा


 भंडारा : जिल्याह्यातील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पवनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र सावरला नियतक्षेत्र गुडेगाव येथील कक्ष क्रमांक 238 या संरक्षित वनालगत सुधाकर सीताराम  कांबळे,वय अंदाजे 45 वर्ष, राहणार गुडेगाव तालुका पवनी, जिल्हा भंडारा यांचा पाळीव प्राण्यांची ते चराई करत असताना वन्यप्राणी वाघाच्या हल्ल्यात दिनांक 23.6.2023 रोजी दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.


सदरची घटना ही गुडेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक २३८ संरक्षित वनाच्या सीमेपासून अंदाजे २०० मीटर अंतरावरील शेतात घडलेली आहे.या प्रकरणाची माहिती प्राप्त होताच सहायक वनसंरक्षक भंडारा .वाय.बी नागुलवार , वनपरिक्षेत्र अधिकारी .एच.डी. बारसागडे हे आपल्या वनक्षेत्रातील क्षेत्रीय वन कर्मचारीसह तसेच पोलीस ठाणे पवनी येथील पोलीस निरीक्षक हे त्यांचे कर्मचाऱ्यांसह व प्राथमिक प्रतिसाद दल येथे सदस्य हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.


तसेच सदर घटनेची माहिती प्राप्त होताच उपवनसंरक्षक भंडारा राहुल गवई, पी. जे. कोडापे विभागीय वन अधिकारी(दक्षता),  साकेत शेंडे, सहाय्यक वनसंरक्षक ,  रोशन राठोड सहाय्यक वनसंरक्षक यांनी मृतांच्या नातेवाईकांना ग्रामीण रुग्णालय पवनी येथे भेट घेऊन सांत्वन केले.  वन विभागाद्वारे मृताच्या पत्नीस आर्थिक मदत म्हणून शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ देय असलेली रक्कम दहा लक्ष रुपयांचे धनादेश व पंधरा हजार रुपये रोख मदत करण्यात आली.

 

सदर वाघाचा मागवा घेण्याकरिता जलद कृती दल नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांना पाचरण करण्यात आलेले आहे.सदर वन्य प्राण्यावर निगराणी ठेवण्याकरिता परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरा लावण्यात आलेले आहेत.वन विभागातर्फे स्थानिकांना जंगल परिसरामध्ये एकटे फिरण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच पवनी वनक्षेत्रात उद्भवणाऱ्या मानव - वन्यप्राणी संघर्षाचे अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आव्हान वनविभाग भंडारा मार्फत करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !