कृषी केंद्र दुकानदाराकडून बिल देण्यास नकार सर्वसामान्य शेतकऱ्यांची होत आहे.आर्थिक लूट.
अमरदीप लोखंडे - उपसंपादक
ब्रम्हपुरी : २८/०६/२३ तालुक्यात पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असला तरी शेतीचे कामास मंद गतीने सुरुवात होत आहे.
पाऊसाची चाहूल लागताच शेतकरी साहित्याची जमवा जमव करताना दिसतात कृषी केंद्रातून बियाणे ,खते, फवारणी उपकरणे आदी खरेदी करून ठेवतात.मात्र ब्रम्हपुरीत काही कृषी केंद्रात साहित्य किंवा अन्य शेती उपयुक्त सामान खरेदी केली तरी त्यांना ओरिजनल बिल न देता कच्चे बिल देऊन समाधान करतात.बिल न दिल्याने सदर साहित्याची किंमत किती हे कळत नसल्याने शेतकरी ग्राहकाची आर्थिक लूट होताना दिसत आहे असा काही सा प्रकार ब्रम्हपुरीत एका कृषी केंद्रात शेतकऱ्याला कच्चा बिल देल्याची घटना घडली.
आज एक शेतकऱ्याने ब्रम्हपुरी शहरातील एका कृषी केंद्रातूनऔषध फवारणीचे पंप विकत घेतला आणि त्या शेतकऱ्याने दुकानदाराला पंप घेतल्याचे बिल मागितले असता त्यांनी चक्क नकार दिला आणि कोणत्याही दुकानात गेलात तरी पंप विकत घेतल्याचे तुम्हाला बिल मिळणार नाही असे ठणकावून सांगितले.
आणि त्यांनी त्या शेतकऱ्याला विकत घेतलेल्या पंपाचे बिल एका कोऱ्या कागदाच्या को-या पट्टी वरती दुकान चे पंप घेतल्याचे बिल दिले.यावरून अनेक कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना कच्चे बिल देऊन शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे दिसते. सर्वसाधारण शेतकऱ्याची आर्थिक लुट करून स्वतःची तिजोरी भरत आहे.अशा दुकानदारावर कृषी विभागाने व शासनाने धाड टाकून चौकशी व योग्य कारवाई करून साधारण शेतकऱ्याची होत असलेली लूट थांबवावी ही मागणी एका जागृत शेतकऱ्याने केली आहे.
दुकान मध्ये विक्री करता ठेवण्यात असलेल्या शेतीविषयक साहित्याची,बी बियाणाची व इतर साहित्याची विक्री किंमतिचे फलक दुकानच्या दर्शनी भागात लावण्यास बाद्य करावे.