चिमूर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न.
एस.के.24 तास
चिमूर : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर द्वारा आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न झाले. शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात झालेल्या शिबिराच्या अध्यक्षस्थानी औ. प्र. संस्थेचे आय.एम.सी .चेअरमन अनिल मेहेर होते. उद्घाटन आ. बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील झाडे यांच्या हस्ते झाले. शिबिराचे प्रास्ताविक प्राचार्य मुरलीधर गायकवाड यांनी केले.
दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधी या विषयावर प्रा.डॉ.खंगार यांनी मार्गदर्शन केले तर व्यक्तिमत्व विकास व मुलाखतीचे तंत्र या विषयावर बंडोपंत बोढेकर यांनी मार्गदर्शन केले.
वैद्यकीय क्षेत्रातील संधी या विषयावर डॉ.अश्विन अगडे यांनी तर पोलिस विभागातील संधी या विषयावर पोलिस निरीक्षक श्री.मनोज गभणे यांनी मार्गदर्शन केले. वनविभागातील नोकरीच्या संधी आणि प्रशिक्षण या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.किशोर देऊळकर यांनी मार्गदर्शन केले तर राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान याबाबत प्रा. अशोक चरडे यांनी संवाद साधला.
या सत्रात उत्तम रांगोळीचे रेखाटन केल्याबद्दल चार विद्यार्थीनींना ग्रंथ भेट देऊन बंडोपंत बोढेकर यांनी सन्मानित केले. सूत्रसंचालन प्रकाश मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक राजेश कहुरके यांनी केले.