सिर्शी येथे बिबट्या च्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार.

सिर्शी येथे बिबट्या च्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : सावली तालुक्यातील सिर्शी गावात बिबट्याने गावात शिरकाव करून दादाजी पा किनेकार व संजय वसाके यांच्या घरी गोठ्यात शिरकाव करुन बिबट्याने शुक्रवार रोजी पहाटे च्या सुमारास गावात येऊन तिन शेळ्या वर हल्ला करुन दोन ठार तर एक जखमी केल्याची घटना उघडकीस आली.


यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूने आर्थिक नुकसान झाले असल्याने पंचनामा करून योग्य मोबदला देण्याची विनंती वन विभागाकडे केली आहे. हा परिसर जंगलव्याप्त असून यात गावात व आजूबाजूचा परिसरात मानवी व पशुधनावर नेहमीच वन्य प्राण्यांचे हल्ले होताना दिसून येत आहेत याकडे वन विभागाने वन्यप्राणी गावात शिरकाव करणार नाही याकरिता उपाययोजना करण्याचे नागरिकात बोलल्या जात आहेत.


बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर गावात येऊन हल्ला चढवीत ठार मारत असल्याने नागरिकात कमालीची दहशत पसरली असुन बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे यादरम्यान वन विभागाचे सिर्शी बिट येथील वनरक्षक मुंढे व चकपिरंजी येथील वनरक्षक विश्वास चौधरी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केले.त्यावेळी उपस्थित शेळी मालक व गावकरी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !