ब्रम्हपुरी तहसील ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची शाखा स्थापित.

ब्रम्हपुरी तहसील ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची शाखा स्थापित.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,०६/०६/२३ महा.अंनिसचे संस्थापक  डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन ब्रम्हपुरी चे सामाजिक कार्यकर्ते सी.एम.मेश्राम सर यांची ब्रम्हपुरी तहसील परीसरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची शाखा असावी अशी मागणी होती.त्यासाठी त्यांनी महा.अंनिस च्या नागभीड तहसील शाखा कार्यकारिणीचे प्रधान सचिव अरुण पेंदाम  यांचेशी संपर्क साधला व आज  तेथील प्रतिष्ठीत  लोकांना एकत्रित केले व महा.अंनिस ची ब्रम्हपुरी  शाखा स्थापना केली.

नालंदा पत संस्था ब्रम्हपुरी च्या-दालनात   संपन्न झालेल्या या सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर, जिल्हा नागपूर कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे ,शिला डोंगरे  नागपूर  तसेच चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.डाँ. युवराज मेश्राम उपस्थित होते.सभेची सुरुवात भारतीय संविधानाच्या  सामुदायिक उद्धेशीका वाचनाने झाली व तद्नंतर नविन कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया आरंभ झाली.


उपस्थित  सर्व सभासदांनी  सर्वानुमते व एकमताने अध्यक्ष म्हणून समाजसेवक आयु. चंद्रशेखर एम. मेश्राम, उपाध्यक्ष. आर. जे. रामटेके, कार्याध्यक्ष.एम. ई. खोब्रागडे,प्रधान सचिव शरद शेंडे, बुवाबाजी निर्मूल गंगाधर मडावी, महिला विभाग डॉ.पूनम घोनमोडे, वैज्ञानिक जाणीव आयुष्य.प्रमिला सी. मेश्राम, विविध उपक्रम फाल्गुण मेश्राम, पत्रकार सोशल मीडिया. आयु. अमर गाडगे, महिला व सांस्कृतीक विभाग प्रा. सुप्रिया  तलमले, कायदे- विषक आयु. ऍड. मृगेंद्र खोब्रागडे तसेच आयु.वैकुंठ टेंभुर्णे,आयु. जितेंद्र फुलझेले, ब्रम्हदास बी. बनकर, आयु. जयश्री आर. रामटेके  व इतर पदाधिकारी यांची निवड  करण्यात आली.

             

कार्यक्रमाची प्रस्तावना -आयु. जिल्हा कार्याध्यक्ष चि-तरंजन चौरे यांनी प्रस्तुत केली.सुत्र संचालन - -आयु. एम. ई. खोब्रागडे यांनी केले तर आभार आयु. चंद्रशेखर एम. मेश्राम यांनी मानले.या प्रसंगी यांनी चळवळीचे गीत सादर केले.  नवनियुक्त कार्यकारिणी उच्चविद्याविभूषित बुद्धीजीवी व  चळवळीतील महिला कार्यकर्त्यांनी सज्ज अशी महाअंनिस ची चळवळ अधिक जोमाने विवेकी विचाराने पुढे नेतील यात शंका नाही.  यशस्वीतेसाठी सर्व शाखांचे पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी चे पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !