सायकल स्नेही मंडळातर्फे बामणीत सायकल रॅली उत्साहात संपन्न.

सायकल स्नेही मंडळातर्फे बामणीत  सायकल रॅली उत्साहात संपन्न.


एस.के.24 तास


बामणी बल्लारपूर : जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने सायकल चालवा, प्रदूषण टाळा, आरोग्यवान व्हा असा महत्त्वपूर्ण संदेश पोस्टरद्वारे देत बामणी गावातून सायकल रॅली उत्साहात काढण्यात आली.  प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील पाण्याची टाकी ते राजुरा टी पॉइंट तर पुढे बामणी गाव मुख्य रस्ता तसेच गुरुनानक महाविद्यालय, टीचर कॉलनी अशा मार्गाने सदर रॅली काढण्यात आली .रॅलीला बामणी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. प्रल्हाद अलाम यांनी  हिरवी झेंडी दाखवून अभियानाची  सुरुवात झाली.  


याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  उपसरपंच सुभाष ताजने,प्रा.घ्यार,वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुरेंद्र उमरे  आदी मान्यवर उपस्थित होते.त्या प्रसंगी प्रास्ताविकातून सायकल दिनाचे महत्त्व विनायक साळवे गुरुजी यांनी विशद केले.सूत्रसंचालन गजानन चिंचोलकर गुरुजी यांनी केले तर आभार सरल फाऊंडेशनचे सचिव राजेश बट्टे यांनी मानले.या रॅलीत लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,तरुण वर्ग व शिक्षकवृंद असे सर्व घटकातील मंडळी सहभागी झाले होते. सायकल स्वारांनी सायकल चालवण्याचे महत्त्व सांगणारे नारे व  सायकल वर घोषवाक्याची  पोस्टर  लावलेले होते. 


या रॅलीत  ग्रामपंचायतचे कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. समारोप चिंचोलकर गुरुजी,  देवराव वाढई,  सरल फाउंडेशनचे अध्यक्ष राजू करवटकर,राजेश पोलगोनी, नितीन वराटकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या प्रेरणेने सदर सायकल स्नेही मंडळाची स्थापना आणि रॅलीचे आयोजन होत असल्याचा उल्लेख विनायक साळवे यांनी आपल्या भाषणातून केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश उरकुडे, घनश्याम जुवारे,विलास घुंगरूटकर,सचिन बरडे, ज्ञानेश्वर काटोले ,बंडू मोरे,माधव भोयर,शरद मडावी, एन.प्रकाश,दादाजी डेरकर आदींनी  सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !