अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा द्या. तिव्र निदर्शने आंदोलनातून वंचित बहुजन आघाडीची मागणी.


अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा द्या.


तिव्र निदर्शने आंदोलनातून वंचित बहुजन आघाडीची मागणी.


एस.के.24 तास


गडचिरोली : महाराष्ट्रात  दिवसेंदिवस महिलांवर अन्याय,अत्याचार व बलात्काराच्या घटनात वाढ होत आहे,या घटणा रोखण्यात  राज्य सरकार अपयशी ठरले असल्याने विकृतांवर कायद्याचे वचक नसल्यामूळे आलापल्ली सारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटणा घडत आहेत.


 याला पूर्णपणे राज्य सरकार कारणीभूत आहे त्यामूळे राज्य सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतिने येथिल ईंदिरा गांधी चौकात तिव्र निदर्शने करण्यात आले व आलापल्लीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-यां नराधमांचा जाहिर निषेध करून अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.


आलापल्ली येथे वर्ग दहावीची मार्कलिस्ट आणण्यासाठी गेलेल्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी व अत्यंत निंदणीय कलंकीत असतांना सुद्धा आदिवासीच्या आरक्षणावर निवडून आलेल्या आमदार व खासदारांनी कोणतिही प्रतिक्रीया दिली नाही,अत्याचारग्रस्त मुलीला साधी भेट देऊन सांत्वन सुद्धा केले नाही त्यामूळे जनतेच्या मनात प्रचंड राग, चिड, आक्रोश आहे त्यामूळे जिल्ह्यातील आमदार व खासदारांचा सुध्दा निषेध करण्यात आला.


निदर्शने करणा-या कार्यकर्त्यांनी  राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केल्यामूळे ईंदिरा गांधी परिसर दणाणून गेला,सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,बाल लैंगीक कायद्यासह ऑक्ट्रासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.


निदर्शने आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशीद शेख, महिला आघाडीच्या मालाताई भजगवळी , मिडीया प्रमुख  जावेद शेख ,निरद सावळे, कवडू दुधे,  प्रफुल मेश्राम, शोभा शेरकी, तेजराव नेतनकर, गजानन मेश्रा , वंदना येडमे, सुजाता जुरेसिया, सुजाता वासनिक, प्रशिक रामटेके, शकुंतला दुधे, डिंपल खंडागळे, श्वेता बोरकर आदिंसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

     

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !