मंगरमेंढा येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : तालुक्यातील दर्शनी माल या गावात लाइनमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.ही घटना १९ जून रोजी घडली.वैभव तुळशीराम जेंगठे (वय,२४, रा.मंगरमेंढा ता.ब्रहापुरी,जि.चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे.ते महावितरणच्या येवली क्षेत्रात कार्यरत होते.
दर्शनी माल येथे एका विजेच्या खांबावर कार्बन काढायला चढले असता,चुकीने तारांना स्पर्श झाला. यात त्यांचा मृत्यू झाला.