आंबाडी ग्रामपंचायत येथे ललिता बोरकर व सूनंदा बावणे अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित.

आंबाडी ग्रामपंचायत येथे ललिता बोरकर व सूनंदा बावणे अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित.


नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा


भंडारा : महाराष्ट्र राज्य सरकार चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महीला बालविकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सामजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या ग्रामीण महिलांना प्रोत्साहन मिळावं  त्यांच्या सामजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ग्रामपंचायत स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्याचें ठरवले आहे.


 महाराष्ट्र शासन निर्णयाची दखल घेत भंडारा नजीकच्या आंबाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत गीरोला येथील प्रबोधनकार व जण  सामन्याच्या न्याय हक्काच्या लढाईत सक्रिय सहभाग  विविध संघटनाच्या पदाधिकारी आहेत त्या  लिपीक पदावर कार्यरत आहेत प्रत्येक समाजिक कार्यात शासन सेवेच्या योजना नियमबद्ध पद्धतीनें लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणाऱ्या सौ .सुनंदा प्रकाश बावणे, व आंबाडी येथील महीला राजसत्ता आंदोलनाच्या संघटन प्रमुख म्हणून महीला सशक्तीकरण करणे महीला बचत गटाच्या  विविध योजना व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणे, विविध पंचायत समितीच्या  प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून  कार्य करीत असलेल्या कार्याची दखल घेत ग्रामविकास अधिकारी श्याम बिलवणे यांनी सौ ललिता प्रमोद बोरकर यांच्या नावाची शिफारस केली.


आंबाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आंबाडी गटग्रामपंचायत सरपंच भजन कारू भोंदे, ग्रामविकास अधिकारी श्याम बीलवणे, उपसरपंच गुरुदास बावनकर ग्रामपंचायत सदस्य अमीर बोरकर ,ग्रामपंचायत सदस्य मनोहर धुर्वे , सौ.शोभाबाई  कडव,प्रमिला लांजेवार  पोलिस पाटील दुर्गा नत्थु शेंडे, गीरोला पोलिस पाटील लक्ष्मण बावनकर  सुखदेव मारबते, सविता गोंडाने यांच्या उपस्थितीत स्मृती चिन्ह प्रमाणपत्र व पाचशे रुपये रोख पारितोषिक प्रदान करून सौ सुनंदा बावणे, व सौ. ललिता बोरकर यांना सन्मानित करून गौरविण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !