महाराष्ट्रातील प्रत्येकाला पाच लाखांचे आरोग्य कवच.
★ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या एका निर्णयाने महाराष्ट्राला आरोग्य संजीवनी.
एस.के.24 तास
मुंबई : (प्रतिनिधी : दशरथ कांबळे) ना नियमांचा बागुलबुवा, ना अंमलबजावणीत दिंरगाई. या एका सुत्रावर लोकाभिमुख सरकारची नव्याने पायाभरणी करणाऱ्या मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गेल्या वर्षभरातील सर्वच निर्णयाचे महाराष्ट्राने स्वागत केले आहे.
बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्याच्या हिताचे वेगवान निर्णय घेताना मुख्यमंत्री महोदयांनी जनतेच्या आरोग्यासंदर्भात काही मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्राला आरोग्य संजीवनी प्रदान केली आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून यात नागरिकांना आता ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कॅबिनेट बैठकीतील या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला ५ लाखांचे आरोग्य कवच प्रदान झाले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय राज्याच्या आरोग्य यंत्रणेला उभारी देणारा असून जनसामान्यांना रक्षण कवच देणारा आहे.
निर्णयाची विशिष्ट्ये : -
- महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनांचे होणार एकत्रीकरण
- महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचे आरोग्य कवच
- पूर्वीच्या दीड लाख रक्कमेत वाढ होऊन आता पाच लाखांचे आरोग्य संरक्षण
- यापूर्वी केशरी आणि अंत्योदय रेशनकार्डधारक होते लाभधारक
- मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे यापुढे सर्वानाच मिळणार आरोग्य विम्याचा लाभ
- दोन्ही योजनांच्या एकत्रीकरणांमुळे १३६५ उपचारांचा होणार लाभ
- सुमारे २ कोटी कार्डचे वाटप करण्यात येणार
- उपचारांसाठी रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात येणार