संविधान बचाव संघर्ष समिती गठीत.

संविधान बचाव संघर्ष समिती गठीत.


एस.के.24 तास


भंडारा : देशात सुरू असलेल्या लोकशाही व संविधान विरोधी केंद्र सरकारच्या विरोधात चुकीचे धोरण अवलंब करून देशाला योगदान देणाऱ्या राष्ट्रपुरुषांचा अपमान करून देशातील संसदीय लोकशाही व संविधान संपवू पाहणार्या प्रस्थापित प्रतिगामी व्यवस्थेच्या विरोधात,प्रति आंदोलन उभारण्यासाठी संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी तसेच देशात दलितांवर होणारे अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात, ओबीसीची जातीय जनगणना न करणाऱ्याच्या विरोधात,जातीय मानसिकतेतून संसदेच्या उद्घाटनप्रसंगी  दलित आदिवासीना बहिष्कार करणाराच्या


 विरोधात,नवीन संसद भवन मध्ये सम्राट अशोक यांच्या राजमुद्रा न ठेवता प्रस्थापितांच्या सिंगोल ठेवण्याच्या विरोधात,ओबीसी, दलित आदिवासीच्या आरक्षण संपवून खाजगीकरण करणाऱ्याच्या विरोधात, अशा अनेक लोकशाही विरोधी व संविधान चा अपमान करणाऱ्याच्या विरोधात, प्रति आंदोलन उभारण्यासाठी विविध समविचारी सामाजिक संघटना व राजकीय पक्षाची 16 जून 2023 रोज शुक्रवारला दुपारी 12-30 वाजता स्थळ विश्रामगृह भंडारा येथे बैठक चर्चासत्र यशस्वीरीत्या पूर्ण झाली.


या चर्चासत्र बैठकीमध्ये ओबीसी सेवा संघ,ओबीसी क्रांती मोर्चा,नॅशनल पीपल फेडरेशन आदिवासी संघटना,एकलव्य ढिवर संघटना,बिरसामुंडा बीग्रेड संघटना,भारतीय कम्युनिस्ट पार्टी,प्रहार संघटना,काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप मधील आंबेडकरवादी कार्यकर्ते, रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट,आंबेडकरवादी पार्टी,रिपब्लिकन सेना,भीम आर्मी,भीमशक्ती संघटना,कास्ट्राईब संघटना, ,मानव अधिकार सेवा संघटना,सामाजिक न्याय संघटना,भारतीय बौद्ध महासभा,सम्राट अशोक सेना, समता सैनिक दल,भारत मुक्ती मोर्चा,बी आर एस पी,पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बुद्धिस्ट युथ फोर्स, राष्ट्रीय अमर कला निकेतन सांस्कृतीक संघटना, इत्यादी समविचारी सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या उपस्थितीत "संविधान बचाव संघर्ष समिती" स्थापन करण्यात आली.


यावेळी चर्चासत्र बैठकीचे अध्यक्ष मा.रोशनजी जांभुळकर होते तर मा.गोपालजी सेलोकर ओबीसी सेवा संघ,मा.संजयजी मते ओबीसी क्रांती मोर्चा,मा.रूपचंद रामटेके भारतीय बौध्द महासभा, सदानंद धारगावे विदर्भ शेतकरी संघटना,मा.आय एल नंदागवळी आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, मा.सुर्यभानजी हुमने कास्ट्राईब संघटना प्रामुख्याने उपस्थित होते.


जिल्ह्यातील सर्व समविचारी सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उपस्थितीत संविधान बचाव संघर्ष समिती स्थापन करून सर्वानुमते समिती निमंत्रकपदी मा. नित्यानंदजी मेश्राम मा.आय.एल.नंदागवळी, मा.अंबादासजी नागदेवे शाहीर,मा.संजयजी मते, शशिकांतजी भोयर,मा.ई.व्ही. बारमाटे,मा.मोरेश्वरजी गजभिये,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.आणि संयोजक/व्यवस्थापक पदावर मा.जयेंद्र गुलाब देशपांडे,मा.गोपालजी सेलोकर,मा.चंद्रशेखरजी टेंभुर्णे,मा.अचलजी मेश्राम मा.रोशनजी जांभुळकर,मा.हरिश्चंद्रजी धांडेकर,रूपचंदजी रामटेके यांची नियुक्ती करण्यात आली.


सदर चर्चासत्र बैठकीचे प्रस्ताविक मा.माजी समाज कल्याण सभापती,चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले, सुत्रसंचलन जयेंद्र गुलाब देशपांडे यांनी केले यांनी केले तर सर्व सन्माननीय उपस्थितांचे  आभार मा.अचलभाऊ मेश्राम जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !