भंडारा जिल्हातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगिती करून नव्याने भरतीप्रक्रिया घ्यावी. - शेखर जिभकाटे
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : भंडारा एचडीओ कार्यालयात राबवण्यात आलेली पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम लेखी दिलेल्या परीक्षेची यादी जाहीर न करता तोंडी परीक्षा घेण्यात आली त्यामुळे या भरतीमध्ये सुशिक्षित विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून भरतीची प्रक्रिया नव्याने करण्यात यावी उपविभागीय अधिकारी भंडारा यांच्या कार्यालयात झालेली पोलीस पाटील पदाची भरती मध्ये लोकांच्या बोंबाबोंब आर्थिक देवाणघेवाण करून भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये हुशार विद्यार्थी व त्यांच्या बुद्धिमत्तेचा कोणताही प्रकारचा विचार न करता नियुक्ती करण्यात आलेली आहे पोलीस पाटील पद भरती मध्ये लेखी व तोंडी परीक्षेचा निकाल गैरवर्तणूक करून लावण्यात आलेला आहे त्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामध्ये सर्वस्वी जबाबदार उपविभागीय अधिकारी या भरती शिक्षेस पात्र आहे तरीपण आपण या संबंधी सखोल अभ्यास करून भरतीची प्रक्रिया नव्याने करण्यात यावी.
ही मागणी भंडारा जिल्हा अधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे उपविभागीय कार्यालयात पोलीस पाटील भरती मध्ये तोंडी झालेल्या परीक्षेमध्ये त्यांच्या आवाजासहित सी.सी. कॅमेरा मध्ये येणारे फुटेज व शिष्टमंडळ बसलेले असता त्यांनी केलेल्या प्रश्न व अर्जदार यांनी दिलेले उत्तर व त्यांच्या तोंडाद्वारे निघणारे शब्द आवाजासहित सीसी फुटेज चेक करण्यात यावे व चेक केल्यानंतर ती सीसी फुटेज तक्रारदार स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार माहिती अधिकार संघटनेला सादर करण्यात यावे.
अशी इच्छा संघटनेने भंडारा जिल्हा अधिकारी यांच्याकडे मागणी घातलेली आहे त्यामुळे होणारा मोठा भ्रष्टाचार उघडीच येणार व योग्य न्याय सर्व विद्यार्थ्यांना मिळेल व त्यामध्ये विद्यार्थ्यांचा समाधान होईल असेच आपणाकडून कार्य घडावे अशी अपेक्षा आम्ही करीत आहोत असे न झाल्यास आम्ही उपविभागीय अधिकारी भंडारा यांची तक्रार विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे करण्यात येईल असा इशारा पञकार संघटनेनी दिला.