झोपेत असलेल्या पत्नी चा केला पती ने खून : दोन्ही मुली गंभीर जखमी.
राजेंद्र वाढई : उपसंपादक
पोंभुर्णा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोप येत असलेल्या पत्नीचा कुऱ्हाडीने निर्दयीपणे खूण करून दोन चिमुकल्या मुलींनाही जीवनाशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. आईचा जीव गेला असून दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांची मृत्यूची झुंज सुरू आहे. क्रूर निर्दयी ही घटना घटना चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा तालुक्यातील डोंगर हळदी (माल) या गावी आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. आशा मनोज लेनगुरे (40) असे मृत पत्नीचे तर अंजली मनोज लेनगुरे (17), पुनम मनोज लेनगुरे (12) असे जखमी मुलींचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार,पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी (माल) येथील आरोपी पती मनोज लेनगुरे हा रहिवाशी होता. त्याचे पश्यात पत्नी आशा व अंजली, पुनम ह्या दोन मुली असा परिवार आहे.मात्र पती मनोज हा पत्नी आशा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.त्यामुळे त्यांचेमध्ये तंटे भांडणे व्हायचे.काल सोमवारी सर्व कुटुंब जेवणानंतर झोपी गेले.आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास पत्नी आशा व मुली अंजली, पुनम हया गाड झोपेत असताना पहाटे तीन वाजताचे सुमारास सर्व प्रथम पत्नी हिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून खूण केला.
त्यानंतर झोपेत असलेल्या मुली अंजली व पुनम ह्या गाड झोपेती मुलीवरही कुऱ्हाडीने वार करून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्रथम पत्नी वर कुऱ्हाडीने सपासप वार करून खूण केला.त्यानंतर झोपेत असलेल्या मुली अंजली व पुनम ह्या गाड झोपेती मुलीवरही कुऱ्हाडीने वार करून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
सकाळी या घटनेची माहिती सर्वत्र पसरली.लगेच उमरी पोतदार पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी केली.पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत जागीच ठार झाली होती.
तर दोन्ही मुली गंभीर जखमी आढळून आल्या. लगेच गंभिर जखमी दोन्ही मुलींना चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.प्रकृती गंभीर असून त्या मृत्यूची झुंज देत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतकाचा पती मनोज लेनगुरे (40) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतकाचा पती मनोज लेनगुरे (40) याला अटक केली आहे.